*नेर:* *गणेश उत्सव निमित्त नेर येथे पोलीस प्रशासनाकडून रुट मार्च* *नेर:* धुळे तालुक्यातील गणेश उत्सव निमित्त नेर,कुसुंबा येथे पोलीस प्रशासनाकडून रुट मार्च काढण्यात आला.तसेच आज रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मा पोलीस अधीक्षक सो धुळे मा अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे मा उपविभागीय पोलिस अधिकारी धुळे ग्रामीण साक्री भाग यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद पाटील सो तसेच धुळे तालुका पोलीस स्टेशन चे सर्व दुय्यम पोलीस अधिकारी आणि पोलीस अमलदार आणि होमगार्ड असे आगामी श्री गणेशोत्सव या अनुषंगाने आज दिनांक 18-09-2023 रोजी सोमवारी नेर येथील बाजापेठे, जैन गल्ली,गांधी चौक, दुर्गा माता चौक,मेन रोड,महात्मा ज्योतिबा फुले चौक,रायवट शाळा नेर म्हसदी फाटा असे रूट मार्च घेण्यात आला असून बंदोबस्त कामी हजर पोलीस अधिकारी पोलीस अमलदार तसेच होमगार्ड यांना आगामी सण उत्सव या अनुषंगाने ब्रिफिंग करून मा. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त सूचना तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांतता अबाधित राहावी. तसेच नेर येथील पोलिस स्टेशला पोलीस कर्मचारी यांना याबाबत योग्य त्या सूचना देवून मार्गदर्शन करण्यात आले.
Related Posts
शहरातील सर्व दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाटी लावण्यात यावे- मनसे
शहरातील सर्व दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाटी लावण्यात यावे- मनसे शहादा- शहरातील सर्व दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाटी…
पावसाळ्यातच सर्पदंश चे प्रमाण देखील वाढतात कारण पावसाचे पाणी हे बिळांमधे शिरल्या कारनाने साप हे बिळातुन बाहेर पडतात व पर्याय म्हणून ते अन्न व निवारा शोधन्या साठी ते मानवी वस्तीत शिरतात. व अपघात होतात असे अपघात होऊ नये म्हणून काय केले पाहिजे
सद्या आपल्या जिल्हात बर्या पैकी प्रमाणात पाऊस झाला आहे व संत गतीने सुरुच आहे व पावसाळ्यातच सर्पदंश चे प्रमाण देखील…
गुटखा किंग वर मोक्का अंतर्गत कारवाई करा : आर.पी.आय आंबेडकर गटाची मागणी…
*गुटखा किंग वर मोक्का अंतर्गत कारवाई करा : आर.पी.आय आंबेडकर गटाची मागणी…* धुळे जिल्ह्यातील गुटखा किंग वर मोक्का अंतर्गत कारवाई…