एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात गणरायाची विधिवत स्थापना..
कलाशिक्षक हितेश चौधरी यांनी साकारली शाडूमातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती..
शिंदखेडा – आज एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात मोठ्या उत्साहात गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयातील कलाशिक्षक श्री.हितेश चौधरी यांनी श्री.दिनेश मराठे यांच्या मदतीने अडीच फूट उंचीची शाडूमातीपासून पर्यावरणपूरक सुंदर गणेशमूर्ती तयार केली आणि नैसर्गिक रंगाचा वापर केला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश यातून दिलेला असून संकुलातील कुत्रीम हौदात मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.