स्व. अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन येथे पुरस्कार वितरण सोहळा

*स्व. अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन येथे पुरस्कार वितरण सोहळा*गोकुळ कोळीयावल (तालुका प्रतिनिधी ) स्व.अंजली सूर्यवंशी यांच्या १३ व्या पुण्यस्मरणार्थ गीतांजली प्रतिष्ठान संचलित स्व. अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन दुसखेडा यांच्या माध्यमातून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर विभाग राजकुमार शिंदे हे होते.प्रमुख उपस्थिती मा. जिप सदस्य भरत भाऊ महाजन, प्रा. जतीन मेढे, प्राचार्य तुकाराम बोरोले,मंडळ अधिकारी बबिता चौधरी,योगेश इंगळे संचालक ग.स संचालक,मुख्याध्यापक आश्रम शाळा धानोरा के. एम. वाघ, जीवन महाजन प्रथमत: स्व. अंजली ताईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करून द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली जे गावातील खरे हिरो ज्यांच्यामुळे समाज व गावाचा विकास होत आहे अशा सत्कारमूर्तींचा सत्कार करून त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रथम नवनियुक्त महिला पोलीस पाटील संगीता दांडगे यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. नवनियुक्त कोतवाल सपना सोनवणे, उत्कृष्ट दिव्यांग कलाकार मुन्ना चौधरी, आदर्श शिक्षक विनोद तायडे, डी. आर. सोनवणे, आरोग्य सेवक सतीश पवार,मनीषा जाधव, अंगणवाडी सेविका छायाबाई सोनवणे, मुक्ताबाई सोनवणे, अंगणवाडी मदतनीस सिंधुबाई पाटील,आशा स्वयंसेविका रेखा सोनवणे, सुनीता सपकाळे, पशु सखी सुनीता सपकाळे, प्रगतशील शेतकरी धर्मेंद्र पाटील, झिरो वायरमन गणेश सोनवणे,शालेय स्पर्धेमध्ये विद्यार्थी मयुरी तायडे, प्रतीक सोनवणे, डीगंबर कोळी, साक्षी पाटील,निलेश पाटील,निल पाटील,वैष्णवी साळवे, यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. जतीन मेढे सर यांनी फाउंडेशन चे कार्याबद्दल माहिती सांगून से.नि डीवाय.एस.पी दिलीप सूर्यवंशी साहेब हे गावातील विद्यार्थी घडवून त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहे तसेच ते फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध स्तुत्य उपक्रम राबवित आहे. यावेळी सरपंच लक्ष्मीबाई सोनवणे, ग्रा. स. चंद्रभागा दांडगे, प्रज्ञा सपकाळे, दिनेश कोळी बंडू कोळी संदीप कोळी,नारायण कोळी, कैलास पाटील,राजेंद्र महाराज दांडगे, डॉ. चेतन चौधरी, प्रदीप सोनवणे,महेंद्र बारे, विनोद कोळी, देवेंद्र बाविस्कर, दीपक सूर्यवंशी, चेतन तळले,संतोष पाटील,योगेश सोनवणे, मुकेश सोनवणे, श्याम दांडगे, यशवंत सोनवणे, ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद तायडे तर आभार नितीन चौधरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल कोल्हे व विशाल दांडगे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!