ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे डॉ. भुषण काटे यांनी दिनेश गोरख कोळी या रुग्नास योग्य ते सहकार्य व उपचार न केल्यामुळे प्राण गेला असुन या घटनेची चौकशी करून संबंधितांवर निलंबित करुन कार्यवाही करावी*

*ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे डॉ. भुषण काटे यांनी दिनेश गोरख कोळी या रुग्नास योग्य ते सहकार्य व उपचार न केल्यामुळे प्राण गेला असुन या घटनेची चौकशी करून संबंधितांवर निलंबित करुन कार्यवाही करावी**(उ.बा.ठा.) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे*( प्रतिनीधी गोपाल कोळी )हातनुर ता.शिंदखेडा येथील गौरख दौलत कोळी हे आपला मुलगा दिनेश गोरख कोळी यास दिनांक २०/०९/२०२३ वार बुधवार रोजी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यास डॉ .भुषण काटे यांच्या कडून योग्य तो उपचार मिळाला नाही त्याच बरोबर डॉ. भुषण काटे यांनी योग्य ठिकाणी उपचार करण्यासाठी नेहण्यास सहकार्य देखील केले नाही त्यावेळी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे रुग्णवाहीका क्र. १०२ होती परंतु रुग्णवाहिका क्र. १०२ चे ड्रायव्हर अमृत पवार त्याठिकाणी रुग्णालयात उपस्थित नव्हते यांच्या तुन एकच गोष्ट लक्षात येते की जर डॉ. भुषण काटे यांनी योग्य उपचार करुन सहकार्य केले असते व रुग्णवाहिका क्र. १०२ चे ड्रायव्हर अमृत पवार रुग्णालयात उपस्थित असते तर आज दिनेश कोळी जिवंत राहिला असता व त्याचा जिव गेला नसता तरी या सर्व घटनेला जबाबदार डॉ. भुषण काटे व रुग्णवाहिका ड्रायव्हर अमृत पवार यास नालंबित करून झालेल्या घटणेची चौकशी करावी व समंधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या संदर्भात (उ.बा.ठा.) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व मयत दिनेश कोळी चे वडील गोरख दौलत कोळी यांनी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांना निवेदन दिले व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की जर समंधीतांना निलंबित करुन योग्य ती कारवाई झाली नाही तर तिर्व आंदोलन करण्यात येईल तसेच त्यांनी सांगितले कि हा शिंदखेडा तालुका पुर्णपणे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भरलेला आहे डॉ. भुषण काटे हे देखील प्रभारी आहेत.उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा व ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा याठिकाणी सर्वसाधारण शेतकरी व गोरगरीब जनता आपल्या उपचारासाठी येत असतात परंतु दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालय व शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालय ची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे तरी स्थानिक लोकप्रतिनिधीचे या कडे दुर्लक्ष आहे जर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सोईसुविधा उपलब्ध केल्या तर शेतकरी व गोरगरीब जसे की आज गोरख कोळी यांचा मुलगा दगावला असे अनेक रुग्णांचे जिव गेले आहेत त्यांना वाचवता आले असते असे सांगितले व निवेदन दिले त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, मार्केट कमिटीचे संचालक वाल्मीक पाटील, शिंदखेडा तालुका प्रमुख गिरीश देसले,नंदुभाऊ पाटील,मयत दिनेश कोळी चे वडील गोरख कोळी सह अनेक ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!