*निलेश देवरे यांची कनिष्ट अभियंता निवड झाल्याबद्दल मालपुर येथे सत्कार करण्यांत आला*( मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी ) मालपुर ता.शिंदखेडा येथे महात्मा फुले फाउंडेशन यांच्या वतीने श्री निलेश रघुनाथ देवरे कनिष्ठ अभियंता वीज वितरण कंपनी हे एमपीएससीच्या परीक्षेत यशस्वी झाले त्यांची निवड जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती झाली म्हणून त्यांचा सत्कार महात्मा फुले फाउंडेशन मालपुर यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाला माजी. सरपंच नानासाहेब हेमराज पाटील तसेच माजी उपसरपंच प्रकाश तात्या पाटील महात्मा फुले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर माळी सदस्य पांडुरंग सूर्यवंशी दामोदर माळी अंकुश माळी काशिनाथ माळी गिरधर माळी कैलास माळी राजाराम जिभाऊ वना माळी मा.उपसरपंच दादाभाई माळी त्याचप्रमाणे गावातील जेष्ठ श्रेष्ठ मंडळी व समस्त माळी समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते या ठिकाणी पांडुरंग सूर्यवंशी दामोदर माळी पत्रकार सदाशिव भलकार सर पत्रकार प्रभाकर अडगळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच श्री निलेश देवरे साहेब यांनी देखील आपले अनुभव व एमपीएससी साठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम माळी व आभार प्रदर्शन श्री परमेश्वर माळी यांनी केले व यावेळी गावातील नागरिक मोठ्यां संख्खेने उपस्थित होते.
निलेश देवरे यांची कनिष्ट अभियंता निवड झाल्याबद्दल मालपुर येथे सत्कार करण्यांत आला
