*नेर:* *शंकरराव खलाणे यांचा कापडणे येथील माळी समाजातर्फे सत्कार:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथील उद्योजक तथा धुळे जिल्हा माळी समाजाचे नेते मा शंकररावजी खलाणे यांची भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी स्तुत्य निवड झाल्याबद्दल त्यांचा कापडणे येथील माळी समाजातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना शुभेच्छा देत व कौतुक देखील करण्यात आले. यावेळी कापडणे येथील मा. उपसरपंच महेश माळी, युवा उद्योजक सुमित माळी,ठेकेदार विश्वास माळी, ठेकेदार लक्ष्मण माळी, मा ग्रा प सदस्य ज्ञानेश्वर माळी, सुशील माळी, कृषी अधिकारी शिवराज माळी, सामाजिक कार्यकर्ते नाना माळी, मामा भाचा ट्रान्सपोर्ट संचालक दिनेश माळी, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र माळी आदी समाज बांधव उपस्थित होते.
शंकरराव खलाणे यांचा कापडणे येथील माळी समाजातर्फे सत्कार
