राहुल शांताराम ठाकरे उर्फ मोगली बाबा (वाळू माफिया) याचे वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने आमचे साप्ताहिक दक्ष जळगांव चे उपसंपादक विकास निंबा पाथरे यांना कट मारल्याचा जाब विचारला असता संबंधिताने त्यांचे कानशिलात मारुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने संबंधित इसमावर हद्दपार करणेबाबत….संदर्भ : दि.२०/०९/२०२३ रोजी राहुल शांताराम ठाकरे (मोगली बाबा) याने विनाकारण मारहाण व धमकी दिली असल्याने त्याचेविरुध्द आमचे साप्ताहिक दक्ष जळगांव चे उपसंपादक श्री. विकास निंबा पाथरे यांनी दिलेली फिर्याद..तक्रारदार : राजेंद्र निकमजिल्हाध्यक्ष-मानव विकास पत्रकार संघ, जळगांव.महाशय, उपरोक्त संदर्भिय विषयांन्वये सविनय निवेदन सादर करतो की, दिनांक २०/०९/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता मी काही कामा निमित्त आव्हाणे येथील तलाठी कार्यालयात माझे सहकारी यांचेसोबत जात होतो. त्यावेळी माझे सोबत असलेले माझे पत्रकार मित्र श्री. विकास लिंबा पाथरे, उपसंपादक जळगांव यांना राहुल शांताराम ठाकरे (मोगली बाबा) यांचे रेतीचे भरलेल्या ट्रॅक्टरने कट मारला त्यामुळे आम्ही पुढे न जाता तेथेच आम्ही थांबले. त्यानंतरअजून थोड्या वेळाने त्यात ठिकाणाहून निळ्या रंगाचे रेतीने भरलेले ट्रॅक्टर आव्हाणे कडून जळगांव कडे येत होते त्यावेळी संबंधितास जाब विचारण्यासाठी आम्ही तेथेच थांबले असता संबंधित ट्रॅक्टर चालकाने मेडीकल समोरच सर्व रेती तेथेच टाकून तो तेथून पळून गेला.त्यानंतर त्या ट्रॅक्टरचा मालक राहुल शांताराम ठाकरे हा तेथेचे उभा होता व त्याने आम्हांस मोठ्या आवाजात विचारले तुम्ही कोण आहात ? येथे का थांबले ? तुमच्यामुळेच माझे माणसाने येथेच रेती टाकून गेला त्यामुळे तुम्ही माझे नुकसान केले. असे बोलून त्याने आमचे मित्र विकास पाथरे यांचे कानशिलात लगावली व आम्हां सर्वांनी धमकी दिली की, आता मी तुम्हा सर्वांना सोडणार नाही, तुमचे हात-पाय तोडल्याशिवाय तुम्हांस येथून जावू देणार नाही. तसेच त्याठिकाणी त्याचे ४० ते ५० साथीदार तात्काळ आम्हांस मारण्यासाठी जमा झालेत. त्यास आम्ही पत्रकार असल्याचे सांगुन सुध्दा त्याने आम्हांस धमकी दिली.सदर इसमा जवळ गावठी पिस्तुल तसेच जिवीतहानी होईल अशा प्रकारचे शस्त्र देखील होते, तेच शस्त्र दाखवून त्याने आमचे पत्रकार मित्र व आम्हांस जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे.सदरील घटना घडल्यावर आम्ही लागलीच तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी गेलो असता त्यांनी स्पॉट पंचनामा केला त्यावेळी संबंधितांनी हे आमचे येत नसल्याने त्यांनी त्यांचेच गाडीत बसवून आम्हांस शहर पोलीस स्टेशन येथे सोडले. तेथे गेल्यावर सर्व घटना आम्ही संबंधित पोलीस निरीक्षक यांना सांगितली सदर इसम राहुल शांताराम ठाकरे याचेविरुध्द आमचे मित्र श्री. विकास पाथरे यांनी गु.र.नं.०२९० दाखल केला.त्याच वेळी शहर पोलीस स्टेशन, जळगाव येथे राहुल शांताराम ठाकरे उर्फ मोगली बाबा हा त्याची महेंद्र कंपनीची झायलो गाडी क्र.एम.एच.१९ एपी-४५४५ या पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये आला व त्याचेसोबत वरील ४० ते ५० साथीदार सुध्दा आधीच पोलीस स्टेशन मध्ये आलेले होते. तेथे आल्यावर त्याने फिर्यादी व आमचे मित्र विकास पाथरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊ लागली तसेच जे कुणी यास साक्ष देतील त्यांना सुध्दा सोडणार नाही असे सांगु लागला. त्यांनतर तेथे हजर असलेल्या पोलीस संबंधितांना हाकलून लावले.संबंधित राहुल शांताराम ठाकरे उर्फ मोगली बाबा याचा वाळूचा अवैध व्यवसाय असून त्याचे अनेक गुंड प्रवृत्तीच्या इसमांसी संबंध देखील आहेत. तसेच संबंधितांविरुध्द याआधी सुध्दा अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे.तसेच संबंधीतावर राजकीय वरदहस्त असल्याने तो अशा प्रकारचे गुन्हे करण्यास मागे-पुढे पाहत नाही.तरी महाशयांना या निवेदनाद्वारे विनंती की, १) सदरील राहुल शांताराम ठाकरे (मोघली बाबा) याचेपासून आमचे पत्रकार मित्र श्री. विकास निंबा पाथरे व आमच्या जिवीतास धोका निर्माण झाला असल्याने संबंधितांवर महाराष्ट्र राज्यातील प्रसार माध्यमातील व्यक्ती आपले कर्तव्य पार पाडत असतांना त्यांच्यावर होणाऱ्या या हिंसक कृत्यांना आळा बसावा म्हणून प्रतिबंध अधिनियमा अंतर्गत तात्काळ कारवाई व्हावी तसेच तो स्वतःजवळ व त्याच्या गाडीमध्ये अवैध शस्त्र जवळ बाळगुन व गुंड प्रवृत्तीचे ४० ते ५० इसम जवळ ठेवून त्याचा धाक दाखवित असल्याने संबंधितांवर अवैध शस्त्रे बाळगून व गुंड प्रवृत्तीते लोक जवळ ठेवून धमक्या देणे या कायद्यान्वये देखील तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्याचे शस्त्र जमा करण्यात यावे त्यास हद्दपार करण्यात यावे.२) तसेच आम्ही एकटे दुकटे दिवसा, रात्री-अपरात्री, प्रसारमाध्यमाच्या कामा निमीत्ताने बाहेर फिरत असतो व संबंधितांविरुध्द आम्ही तक्रार दाखल केलेली असल्याने त्याचेकडून अथवा त्याचे साथीदार यांचेकडून आमचे व आमच्या परिवारातील सदस्यांचे जीवाचे काही बरेवाईट, घात-अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधीत राहुल शांताराम ठाकरे (मोगली बाबा) व त्याचे साथीदार यांनाच जबाबदार धरावे,.सोबत :- दि.२०/०९/२०२३ रोजी शहर पोलीस स्टेशन, जळगाव येथे दाखल गुन्ह्याची झेरॉक्स प्रत.प्रत माहितीस्तव :-१) मा. ना. गृहमंत्री सोो., महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२२) मा. ना. गुलाबरावजी पाटील सोो., पालकमंत्री, जळगांव३) मा. विरोधी पक्षनेता सोा., महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२ ४) मा. पोलीस महासंचालक सोो., नाशिक परिक्षेत्र, नाशिक५) मा. पोलीस अधिक्षक सोो., जळगांव.१) जिल्हाध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ राजेंद्र निकम २) उपजिल्हाध्यक्ष विकास पाथरे3) शहराध्यक्ष प्रमोद रुले४) जिल्हा संघटक समाधान कोळी५)ॲड सागर शिंपी६) भडगाव प्रतिनिधी यश कुमार ७) शहर प्रतिनिधी ममता माळी८) भडगाव प्रतिनिधी भावेश पाटील९) रावेर प्रतिनिधी विनोद कोळी १०) रावेर तालुका प्रतिनिधी परदीप महाराज११) पोलीस टाइम्स न्यूज प्रतिनिधी बबलू शेख१२) बापू अहिरे १३) अविनाश जोशी.१४) महेश माळी१५ ) सागर पाटील इत्यादी संघटनेचे पदाधिकारी निवेदन देतेवेळी हजर होते
Related Posts
चोपडा बस स्थानकात एस टी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्या करता काम बंद धरणे आंदोलन
*चोपडा बस स्थानकात एस टी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्या करता काम बंद धरणे आंदोलन* चोपडा प्रतिनिधी भिकन कोळी महाराष्ट्र कामगार कृती…
प्रा. भुवनेश्वरी राणे यांना पीएच. डी. पदवी प्रदान
प्रा. भुवनेश्वरी राणे यांना पीएच. डी. पदवी प्रदान साकेगाव येथील कै. यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी…
शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार दिन साजरा करा – माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची मागणी
शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार दिन साजरा करा – माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची मागणीजळगाव – शासन परिपत्रकानुसार 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय…