गणेशाचा छंद जोपासणारा अवलिया.

*गणेशाचा छंद जोपासणारा अवलिया.*मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पा हा सर्वच भक्तांच लाडकं दैवत. असाच बाप्पाचा छंद जोपासणारे मुंबई स्थित गणेशभक्त श्री श्रीकृष्ण सावंत.श्रीकृष्ण सावंत हे मुंबई मधील विधी रेकॉर्डींग स्टुडिओ मध्ये साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत. सन 1990 साली त्यांनी ताडदेव मधील एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जॉब करण्यास सुरुवात केली. तो एस एल स्टुडिओ प्रसिद्ध उद्योगपती शशांक लालचंद आणि राणी वर्मा यांचा होता. या स्टुडिओ मध्ये असंख्य गणेश मूर्ती होत्या.आणि त्याच या श्रीकृष्णाला भावल्या. आणि पट्ट्याला गणपती जमविण्याचा छंद जडला.आज मितीपर्यंत त्यांच्या संग्रहात 850 गणेश मुर्त्या आहेत.साधारण 1 इंचा पासून ते 2 फुटापर्यंत मुर्त्या समाविष्ट आहेत.तसेच गणपतीचे फोटो ही जमविण्याचा त्यांना छंद आहे.साधारण 21000 हजार गणेशाचे फोटो त्यांच्या कात्रण वहीत आहेत. तसेच त्यांना चित्र काढण्याची ही आवड आहे. श्रीकृष्ण सावंत हे सामाजिक कार्य सुद्धा करीत आहेत.श्रीकृष्ण सावंत हे गेली 33 वर्ष ध्वनी मुद्रकाचे काम करीत आहेत. अनेक मोठमोठ्या गायकांची गाणी त्यांनी रेकॉर्ड केली आहेत. आणि आजही करीत आहेत. गणपती बाप्पाचा ध्यास लागलेल्या या अवलियावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहो. ही बाप्पा चरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!