पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी – श्री अभय निकम

*पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी – श्री अभय निकम*महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पर्यावरण संवर्धनाला सहाय्यभूत होईल असे प्लास्टिक संकलन अभियान महाविद्यालयात वर्षभर राबविले जाते. प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेला महाविद्यालयात विद्यार्थी तसेच प्राध्यापक प्लास्टिक संकलन करतात. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जाणीवजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साळवडे गावचे ग्रामसेवक श्री. अभय निकम तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. श्रीपाद कोंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रल्हाद ननावरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन तसेच प्रास्ताविक डॉ. सचिन घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. जाधवर डी एस यांनी केले. या कार्यक्रमावेळी डॉ हिमालया सकट, डॉ जगदीश शेवते, डॉ राजेंद्र सरोदे, प्रा.भगवान गावित, प्रा. जीवन गायकवाड, प्रा. माऊली कोंडे प्रा. महेश कोळपे, प्रा. प्राजक्ता कापरे, प्रा. कोमल पोमण, प्रा. ऋतुजा साळुंखे, प्रा. ऐश्वर्या धुमाळ तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!