संकल्प ग्रुप तर्फे गणेश विसर्जनपूर्व स्वच्छ्ता अभियान.

संकल्प ग्रुप तर्फे गणेश विसर्जनपूर्व स्वच्छ्ता अभियान.ता. 22 गणपती विसर्जना करिता शहादा शहरातील गोमाई नदीवर भाविक भक्त येत असतात. काही दिवसावरच गणेश विसर्जन असल्याकारणाने नदीतील कचरा साफ करण्यासाठी शहादा नगरपालिका व संकल्प ग्रुप यांच्यातर्फे स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. यावेळी कचरा एका बाजूला करून जेसीबीच्या साह्याने रस्ता करण्यात आला. पाचव्या दिवसाच्या गणेश विसर्जन करण्यासाठी शहादा शहरातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठी विसर्जनासाठी येत असतात सध्याची परिस्थिती पाहून संकल्प ग्रुपने नदीकाठील घाण ,कचरा गोळा करून नगरपालिकेच्या वाहणाचा उपयोग करून एका बाजूला करून जाळण्यात आला. या दरम्यान नदीजवळ एक गाय मृत्युमुखी आढळल्याने तिचा विधी संस्कार करून नदीमध्ये पुरण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पाणीपुरवठा विभागाचे इंजिनिअर श्री प्रकाश जावरे ,गोटूलाल तावडे ,गणेश बाशिंगे व संकल्प ग्रुपचे रत्नपाल छाजेड,सुरेश चव्हाण, प्रशांत कदम, शिवपाल जांगिड, डॉ.लक्ष्मण सोनार , राकेश कोचर, संदीप बोरसे, संदीप बेलदार, स्वरूप लुंकड , निखिल सोनार, अमृत मराठे, पिनाकिन पटेल आदि सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!