*नेर:* *झोतवाडे येथे एक गाव एक गणपतीची स्थापना;जि.प.शाळकरी विद्यार्थ्यांकडून आरती:* *नेर:* शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे गावात महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिराच्या सभामंडपात सुंदर अशी चार फुटाची एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.तसेच गावातील जि.प.शाळा येथील विद्यार्थिनी विद्यार्थ्यांकडून महाआरती करण्यात आली होती.तसेच प्रसादासाठी जि.प शाळेतील वानखेडे मॅडम यांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांना मोदक पाठवलेले होते.या लहानशा बाल गोपाळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत उत्सवात महाआरतीचा लाभ घेतला.तसेच अमरावती नदीच्या काठावर वसलेले निसर्गरम्य परिसरात झोतवाडे आदर्श गाव ह्या गावाने ‘एक गांव एक उत्सवाच्या’ माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे.गणेशोत्सव म्हटलं की,जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं.मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत किंवा गल्लोगल्ली. जिथं-तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. पण या झोतवाडे गावात नऊ दिवसांचा एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.हा निर्णय अगदी कौतुकस्पद ठरत आहे.व एक गाव एक गणपतीचा हा उपक्रम सार्वजनिक उत्सव उत्साहात साजरा होताना आपल्याला दिसत आहे.तसेच गावातील वर्गणी गोळा करून हा एक गाव एक गणपतीचा उत्सव तरुण जेष्ठ नागरिक यांच्याकडून आयोजन केले आहे.तसेच गणपती बाप्पाची आरतीसाठी जि प शाळकरी विद्यार्थ्यांकडून आरती करण्यात आली होती.यावेळी देखील आरतीसाठी तरुण ग्रामस्थसह विद्यार्थी उपस्थित होते. *नेर प्रतिनिधि दिलीप साळुंखे*
झोतवाडे येथे एक गाव एक गणपतीची स्थापना;जि.प.शाळकरी विद्यार्थ्यांकडून आरती
