*आज दिनांक 26 / 9 /2023 मंगळवार रोजी म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल शहादा. येथे सकाळी ठीक ११ वाजता माननीय श्री. आर.पी वसावे सर (मुख्याध्यापक ) यांचा अध्यक्षतेखाली व उदघाटक म्हणून मा.श्री. दिनेश सिनारे साहेब मुख्याधिकारी न.प. शहादा यांच्या उपस्थित पालकांशी संवाद साधत शिक्षक-पालक , माता-पालक मेळावा आणि शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पालकांकडून विद्यार्थ्यांच्या अडचणी , गुणवत्ता तसेच शाळेचा युनिफॉर्म बाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली. तसेच शालेय पोषण आहार व शैक्षणिक साधनांचा वापर कसा करायचा याबाबत पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये गुणवत्तेच्या बाब सर्वांप्रती चर्चा करण्यात आली. व विद्यार्थी नियमित हजर कसे राहणार यासाठी त्यांच्या बोलीभाषेत श्री विठ्ठल मराठे सर यांनी संवाद साधला. तसेच सुजाता मॅडम यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. व शाळेचे मुख्याध्यापक श्री आर. पी.वसावे सरांनी विविध योजना त्यासाठी लागणारे कागदपत्र व त्यासाठी पाठपुरावा करणे या संदर्भात पालकांशी चर्चा तथा चर्चेतून मार्गदर्शन केले. उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप खर्डे साहेब यांनी मार्गदर्शन केले.तसेच पालकांनी बरेच प्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन श्री विठ्ठल मराठे सर व आभार प्रदर्शन श्री. एस. एन. कोळी सरांनी मानले या कार्यक्रमाचे राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.*
Related Posts
नेर येथे बैलपोळा सणा निमित्त थाटात सजल्या दुकाने
*नेर:* *नेर येथे बैलपोळा सणा निमित्त थाटात सजल्या दुकाने:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे बैलपोळा निमित्त थाटात सजल्या दुकाने तसेच…
कोळसा घोटाळा प्रकरणी माजी खासदार विजय दर्डा व त्याचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने सुनावली 4 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा!
कोळसा खाणीच्या गैरव्यवहारात राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस…
आदिवासी टोकरे कोळी जमातीचे रमेश लहु कोळी (आबा भगत) यांच्या संशयास्पद मृत्यू ची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली टोकरे कोळी जमातीचा शिरपुर शहर पोलिस स्टेशनवर मोर्चा
आदिवासी टोकरे कोळी जमातीचे रमेश लहु कोळी (आबा भगत) यांच्या संशयास्पद मृत्यू ची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी…