*नेर:*
*नेर रायवट वस्ती परिसरात पेवर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ:*
*जि.प.सदस्य श्री आनंदराव पाटील यांचे नेर गटातील विकास कामांसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे.*
*नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद सदस्य श्री आनंदराव दत्तात्रय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. नेर गावातील व जिल्हा परिषद गटातील गावांच्या विकास कामांना गती मिळावी म्हणून जि.प. सदस्य श्री. आनंदराव पाटील हे नेहमीच प्रयत्नशील असतात. धुळे ग्रामीणचे पाणीदार आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांच्या शिफारशीवरून रायवट वस्ती (नेर) येथे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत 10 लक्ष रुपये खर्चातून पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामास आज प्रारंभ करण्यात आला. या कामामुळे रायवट वस्ती परिसराच्या सुशोभिकरणात भर पडणार असून तेथील ग्रामस्थांच्या वतीने जि.प. सदस्य श्री आनंदराव पाटील यांचे भरभरून अभिनंदन करण्यात येत आहे व समाधान देखील व्यक्त केले आहे. विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी जि.प. सदस्य श्री आनंदराव पाटील, लोकनियुक्त सरपंच गायत्रीताई जयस्वाल,पं.स. सदस्य अंजना मोरे, ग्रा.प.सदस्य जिजाबाई मालचे, दीपक मोरे सामाजिक कार्यकर्ते नारायण बोढरे,निंबा बापू खलाने,रुबाब दादा,मधुकर अहिरे,भिला फौजी, वामन मोरे,गोविंद सोनवणे,सुरेश माळी,प्रविण मोरे,संभा मोरे,नाना भाऊ,आकाश मोरे,रवींद्र मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.