भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षरोषण करण्यांत आले*

*भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षरोषण करण्यांत आले*(मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी)मालपुर ता. शिंदखेडा येथे भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्ठने संपूर्ण महाराष्ट्रात १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान सेवा पंधरवाडा साजरा करण्याचे नियोजन केले आहे. या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान शिक्षण व आरोग्य सभापती महाविर सिंह रावल दरबारगड, मालपुर संस्थान यांच्या शुभहस्ते मालपुर शिंदखेडा, जि. धुळे येथील संगमेश्वर मंदिर परिसरातील माळरानावर ७३ वडाचे झाड लावण्यात आले. विश्वनेता आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या ७३वा जन्मदिवस बाबत सविस्तर माहिती सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश पाटोळे सर यांनी दिली तसेच वडाचे अध्यात्मिक, पौराणिक व वैज्ञानिक महत्त्व विशद केले.यावेळी केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सहसंयोजक अमित पवार रविंद्र पाटील मा.ग्रामपंचायत सदस्य‌ श्रीराम अहिरे युवराज बागुल जयपाल राजपुत कुलदीप सिसोदिया तुषार अहिरे आदी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!