कर्जोत परिसरात बिबट्याचा वावरशेतकऱ्यानं मध्ये भीतीचे वातावरणशेतातून परत येताना रस्त्यात बिबट्या वाघांनी अडवले*

*शहादा (कर्जोत) : ‘*कर्जोत परिसरात बिबट्याचा वावर**शेतकऱ्यानं मध्ये भीतीचे वातावरण**शेतातून परत येताना रस्त्यात बिबट्या वाघांनी अडवले*’*प्रतिनिधी :- तेजराज निकुंभे (शहादा)प्रतिनिधी :- राहुल पाटिल (असलोद). जंगलांचा होणारा ऱ्हास आणि वाढत्या शहरीकरणामुळे वाघ, बिबट्यांचं मानवी वस्तीत शिरकाव करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा शिकार शोधण्याच्या प्रयत्नात प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करतात. यामधून वन्य प्राणी आणि मानवामधील संघर्ष वाढल्याचं दिसतं. अशा प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अनेकदा अशा हल्ल्यांचे व्हिडीओ समोर आल्यावर अंगावर काटा येतो. असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.आज दिनक – २९/०९/२०२३ रोजी, कर्जोत ता. शहादा , जि. नंदुरबार. गावातील शेतमजूर श्री. सुखराम सोनावणे यांना रस्त्यात वाघाने अडवले असता त्यांनी सर्विस्तर महिती दिली. मी सुखराम सोनवणे, शेतकरी श्री. राजेंद्र निम्बाळकर, यांच्या शेतात उसाला पानी लावून संध्याकाळी ६ वाजता घरी परत येतांना, शेतकरी श्री. सचिन हरी पाटिल यांच्या शेताच्या गाड रस्त्याकडून २ वाघ दिसले. त्यांना बघून मी फार घाबरलो अणि लगेच जवळच्या लिंबाच्या झाडावर चढलो. आणि शेतकरी श्री. राजेंद्र निम्बाळकर यांना फोन केला. व सर्विस्तर घटना कायघडली ते त्यांना सांगितले. थोड्या वेळाने ते दोघी जवळच्या शेतकरी श्री. सचिन हरी पाटिल यांच्या शेतात गेले.गावातील शेतकर्यान्नी लगेच तिकडे धाव घेतली व सुखराम सोनवणे यांना सुखरूप घरी आणले.परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे वन विभागाने तिथे पिंजरे ठेवावे अशी शेतकर्यांची मागणी आहे. कारण शेतीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही.गावकरी म्हणतात की “शेतात धान पीक आहे. शेतीला जोडधंदा म्हणून गायी- म्हशी आहेत. त्यांच्या चाऱ्यासाठी शेतात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वन विभागाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!