मराठी साहित्य संस्कृती कला विकास अंतर्गत प्रकाशित गावाकडची माती माती मधली नाती या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी माझी स्वरचित रचना -शीर्षक – जगणंमाणूस म्हणून जगतानाकसं बरं लढायचं?सर्वांशी मिळतं-जुळतं घेतहसत-खेळत जगायचंदूसऱ्यांना मदत करुनजीवन सार्थक करायचंनि:स्वार्थ बुद्धी बाळगूनजनसेवा करत राहायचंअथक परिश्रम करूनखूप खूप शिकायचंविद्येची उपासना करूनविद्यारुपी दान द्यायचंसर्वांशी सद्गुणांनी वागूनमाणूसकीचं दर्शन घडवायचंआळस कुविचार झटकूनरोज जोमाने कामाला लागायचंनवीन पिढी सुशिक्षित, सुसंस्कृत करूनभारत देशाला संपन्न समृद्ध करायचंसाहित्य संगीत आणि कलेवर प्रेम करूनजीवन सुंदर उज्ज्वल बनवायचंसंकटांशी विश्वासाने सामना करतदु:खावर मात करत जगायचंस्वतःबरोबर इतरांना आकार देऊनसर्वांचंच जीवन घडवायचंनवीन आशा-आकांक्षा जपतानाप्रेमानं दुसऱ्यांना सुखवायचंकवयित्री – श्रीमती विद्या दत्तात्रय पवारमु.पो.- नेरे, ता.-भोर, जिल्हा- पुणेमो.नं -९३७२०२९७७१
मराठी साहित्य संस्कृती कला विकास अंतर्गत प्रकाशित गावाकडची माती माती मधली नाती या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी माझी स्वरचित रचना
