डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे परभणी येथे स्टेम आणि रोबोटीक्सची राष्ट्रीय परिषद

डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे परभणी येथे स्टेम आणि रोबोटीक्सची राष्ट्रीय परिषदडॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रात परभणी येथे राष्ट्रीय पातळीवरील टेक्सलरेट 2023 यापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.स्टेम आणि रोबोटीक्स या टेक्नॉलॉजीवर हे आयोजन करण्यात येत असून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असून या उपक्रमात विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रकल्प सादर करण्याची संधी आहे.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या इनोव्हेटिव आयडीया सादर करायच्या आहेत. विविध वयाच्या विद्यार्थ्यांचे गट पुढील प्रमाणे.1) उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी: इयत्ता 6 ते 8 मध्ये2) माध्यमिक व उच्च माध्यमिकचे विद्यार्थी: इयत्ता 9 ते 12 मध्ये3) महाविद्यालयीन विद्यार्थी (अंडरग्रॅजुएट किंवा पदवीधर)4) विशेष श्रेणी: दिव्यांग विद्यार्थी वयाची अट नाहीया उपक्रमाचे आयोजन शिवाजी इंस्टीटयूट ऑफ इंजिनीअरींग आणि मॅनेजमेंट येथे दिनांक 6 ऑक्टोबर रोजी करण्यात येतआहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड , तामिळनाडू, कर्नाटक येथून अनेक शाळा आणि कॉलेजेस यांनी रजिस्ट्रेशन केले असून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. नाव नोंदणी साठी श्री मेघशाम पत्की मोबाइल9890622784 यावर संपर्क करता येईल.या कार्यक्रमास कलाम सर यांचे पणतू एपीजेएमजे शेख सलीम आणि एपीजेएमजे शेख दाऊद स्वतः उपस्थित राहणारआहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दिलीप देशमुख (पुणे), कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणी मा. जिल्हाधिकारी श्री.रघुनाथ गावडे (भा.प्र.से.) आणि प्रमुख पाहुणे म्हणून परभणी पोलीस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. (आयपीएस ), एस.आर.एम. युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्राध्यापक व्ही.सॅम्युअल राज, युवा वैज्ञानिक श्री अजिंक्य कोट्टावर , एम.जी.एम. युनिव्हर्सिटीचे डीन श्री. डी. जॉन चेल्लादुराई,वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मा. डॉ. णण, परभणी महानगरपालीकेच्या आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर मॅडम (भा.प्र.से.) , प्रसिद्ध मराठी संगीतकार आणि गायक श्री दीपक पवार, शिवाजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे संचालक डॉ आनंद पाथ्रीकर, खासदार ओमराजे निंबाळकर, लेफ्ट. डॉ सौरभ दिक्षीत ( इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टुरिझम आणि रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वालीयर), श्री माधव सलगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), श्री संजय ससाणे, शिक्षणाधिकारी (योजना), श्री गणेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) परभणी, डॉ.विशाल लिचडे संचालक, (सॉफ्टसेन्स टेक्नोसेव्ही इंडिया प्रायव्हेट लिमीटेड ) असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.APJ ABDUL KALAMINTERNATIONAL FOUNDATIONRAMESWARAMया कार्यक्रमात प्रत्येक गटातून 5 प्रकल्प निवडले जातील. या प्रकल्पांना एस.आर.एम. युनिव्हर्सिटी, हरियाणा येथे सादरकरण्याची संधी मिळेल. तसेच या निवडक प्रकल्पाच्या आयडिया शास्रज्ञ अभ्यास करून त्या विद्यार्थ्याना पेटंट बनविण्यासमदत करतील. म्हणजेच देशाच्या विकासात बालवैज्ञानिक नक्कीच आपली भूमिका भविष्यात पार पाडतील. हे फक्त प्रदर्शन नव्हे तर प्रत्यक्ष बालवैज्ञानिक घडविण्याचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचा हा प्रयत्न आहे. भारतातप्रथमच एखाद्या अश्या सामाजिक संस्थेचा हा प्रयत्न आहे. सहभाग घेणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.जास्तीत जास्त शाळा कॉलेजने यात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.सदरचा उपक्रम एस.आर. एम युनिव्हर्सिटी , हरियाणा, स्टेम लर्निंग प्रा. ली., के.एन.पी. कॉम्पुटर इंस्टीट्यूट , शिवाजीयुनिव्हर्सिटी ऑफ इंजिनीअरिंग आणि ब्सल क्लास यांचे सहकायााने डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम महाराष्ट्रात आयोजित करीत आहे.अधिक माहितीसाठी श्री मिलिंद चौधरी, जनरल सेक्रेटरी (ठाणे मो. 9167128905) श्री मेघश्याम पत्की ( परभणी मो. 9890622784) , श्री राजकुमार भांबरे (परभणी मो. 9960160951) , मनिषाताई चौधरी(नाशिक मो. 83299707042) , अंजली धचचं ोलीकर (औरंगाबाद मो.7776032889 ), गौरी देशपांडे ( नवी मुंबई मो.8108614553 ), डॉ. आनंद पाथरीकर (परभणी मो. 9403688433 ), प्रिया ठाकुर(परभणी मो. 9673588944) संदीप वारगे(कोकण विभाग समन्वयक मो. 9272698924) यांचेशी संपर्क करावा.धन्यवाद मिलिंद चौधरीसचिव, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!