*दोंडाईचा – शहादा रस्ता व तापी नदी वरील पुल लवकर दुरुस्त करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल (उ.बा.ठा.) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या इशारा*प्रतिनिधी गोपाल कोळीदोंडाईचा- शहादा रस्त्याला जोडणारा तापी नदी वरील पुल कही दिवसांपूर्वी तापी नदीला मोठा पूर आल्यामुळे टाकरखेडा लगत संरक्षण भिंत खचुन रस्त्याखालील भराव खचुन मोठा खड्डा पडल्यामुळे दोंडाईचा- शहादा रस्त्याचा संपर्क तुटल्याने प्रवाशांना मोठा फेरा म्हणजे प्रकाशा मार्गे किंवा शिरपुर कडून सुकवद पुलावरुन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली आहे यासंदर्भात (उ.बा.ठा.) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व कार्यकर्ते यांनी या घटणेची आज दि.१/१०/२०२३ रोजी पहाणी केली त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की पुल तुटण्याची घटणा हि दिवसा झाली म्हणून खुप मोठा अनर्थ टळला अन्यथा या ठिकाणी खूप लोकांची दुर्दैवी घटना घडली असती तसेच त्यांनी ह्यावेळी सांगीतले की दोंडाईचा शहादा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मंजूर होऊन अनेक महिने झाले परंतु अध्याप रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही हा रस्ता अतिशय खराब झालेला असल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले त्यात आता पुलालगत भराव खचुन मोठा खड्डा पडल्यामुळे प्रवाशांना खूप अडचण निर्माण होत आहे तरी ह्या १० दिवसांच्या आत पुलाची दुरुस्ती करणे व दोंडाईचा – शहादा रस्ता दुरुस्ती करण्याचे काम मार्गी लावले नाही तर १० दिवसा नंतर रास्तारोको आंदोलन केले जाईल असे सांगितले त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे ,उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, मनोज पानपाटील सह अनेक टाकरखेडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते
शहादा रस्ता व तापी नदी वरील पुल लवकर दुरुस्त करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल (उ.बा.ठा.) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या इशारा*
