भेलके महाविद्यालयाकडून स्वच्छता हि सेवा अभियान

*भेलके महाविद्यालयाकडून स्वच्छता हि सेवा अभियान* युवा व खेल मंत्रालय (भारत सरकार) यांच्या निर्देशानुसार महात्मा गांधीजयंती निमित्त शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर राष्ट्रीय सेवायोजनेच्या माध्यमातून *स्वच्छता हिच सेवा* अभियान राबविण्यात आले.सदर अभियानाची सुरुवात भेलके महाविद्यालयापासून उपस्थित सर्वस्वयंसेवकांना तसेच प्राध्यापकांना स्वच्छतेची शपथ देऊण स्वच्छताअभियानाची सुरवात केली.स्वच्छतेचे महत्व आपल्या सर्वांगीण जीवनामध्ये अंगिकारण्यासाठी तसेच भारतसरकारच्या सूचनेनुसार सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांनी सांगितले. सदर अभियानातस्वयंसेविका अमिशा व स्वयंसेवक भिमनाथ यांनी आपले मनोगत व्यक्त करतानास्वच्छतेचे आपल्या जीवनात महत्व काय हे थोडक्यात विशद केले.सदर अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच परिसरातीलनागरीकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवत, चेलाडी फाटा ते बनेश्वर मंदिर परीसरस्वच्छ करण्यांत आला.स्वच्छता हीच सेवा उपक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉतुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी प्रा डॉ जगदीश शेवते , प्रा जाधवर डी एस तसेच सर्व ७०स्वयंसेवकांनी तसेच महाविद्यालयातील डॉ.हिमालया सकट, डॉ.राजेंद्र सरोदे,प्रा.सहदेव रोडे, प्रा.पौर्णिमा कारले, प्रा.भगवान गावित, डॉ.सचिन घाडगे,प्रा.जीवन गायकवाड, प्रा.संदीप लांडगे, प्रा.सुदाम ननावरे, प्रा.माउलीकोंडे,प्रा.महेश कोळपे,प्रा.प्राजक्ता कापरे, प्रा.कोमल पोमण,प्रा.ऋतुजा साळुंके, सुमित कांबळे, धनाजी माने, अभिषेक मोरे या सर्वानीपरिश्रम घेतले.सर्व सहभागी स्वयंसेवकांचे आभार स्वयंसेवक ओम इंगुळकर यांने आभार व्यक्तकरत अभियानाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!