*समाजकार्य महाविद्यालय तळोद्यात स्वच्छता मोहीम संपन्न* समाजकार्य महाविद्यालय तळोदा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे राष्ट्रीय सेवा योजना विभाग संलग्न आज दि. ०१ ऑक्टबर २०२३ रविवार रोजी, राज्य शासन आणि केंद्र सरकार यांनी केलेल्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा ह्या अभियानंतर्गत स्वच्छतेसाठी उपजिल्हा रुग्णालय तळोदा आणि गटविकास अधिकारी कार्यालय तळोदा येथे श्रमदान करण्यात आले. सर्वप्रथम स्वच्छता हीच ईश्वर सेवा या अनुषंगाने समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी शपथ घेतले त्यानंतर गट विकास अधिकारी कार्यालय येथे स्वच्छता मोहीम राबवली त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय येथे पार्किंगच्या जागेवर वाढलेले काटेरी झाडे झुडपं रुग्णांनी फेकून दिलेले नारळ तसेच पडलेले प्लास्टिक उचलून प्लास्टिक मुक्त वातावरण करण्यात आले त्याचबरोबर पुरण पोशक आहार विभागासमोर वाढलेले गवत काटेरी झुडपे तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय च्या समोर असलेले गवत काढून परिसर गवत मुक्त व प्लास्टिक मुक्त करण्यात आलासदर कार्यक्रमाचे नियोजन हे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा रामचंद्र परदेशी यांनी केले त्यांच्या मदतीला सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते
समाजकार्य महाविद्यालय तळोद्यात स्वच्छता मोहीम संपन्न
