खा.राहूल गांधींना रावणाची उपमा देणार्‍या**भाजपाच्या राक्षस प्रवृत्तीचा काँग्रेसतर्फे निषेध

*खा.राहूल गांधींना रावणाची उपमा देणार्‍या**भाजपाच्या राक्षस प्रवृत्तीचा काँग्रेसतर्फे निषेध*प्रतिनिधी गोपाल कोळीधुळे- सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या आणि इंडिया आघाडीला घाबरलेल्या भाजपाने नैराश्यातून देशाचे नेते खा.राहूल गांधी यांचा फोटो रावणाच्या रुपात आपल्या सोशल मीडीयावर प्रसारीत केला आहे. खा.राहूल गांधी यांना रावणाची उपमा देणार्‍या राक्षसी प्रवृत्तीच्या भाजपाच्या विरोधात आज धुळे जिल्हा काँग्रेस भवनासमोर जिल्हा व शहर काँग्रेसच्यावतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी काँग्रेस भवनाचा परिसर दणाणून निघाला. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, देशाचे नेते खा.राहूल गांधी यांचा फोटो रावणाच्या रुपात कॉम्प्यूटरव्दारा एडीट करुन भाजपाने आपल्या सोशल मिडीयावर प्रसारीत केला. भाजपाच्या अशा राक्षसी विचारसरणी व प्रवृत्तीविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले,काँग्रेस विधीमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दि.6 ऑक्टोंबर रोजी दु.12 वा. धुळे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवनाच्या आवारात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी सांगितले कि, सन 2014 साली केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडविण्याचे काम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वार्‍यावर सोडून दिले असून ते आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी काम करीत आहेत. देशाचे नेते खा.राहूल गांधी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपाचे संपूर्ण प्रचारयंत्रणा काम करीत आहे.हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. पण राहूल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून देश आणि जनता जोडण्याचे काम केले आहे.भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची चिरफाड केली. त्यामुळे हताश झालेल्या भाजपाने खोट्या केसेसमध्ये राहूल गांधींना अडकवून खासदारकी रद्द केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी पुन्हा बहाल केली. रावणाच्या वृत्तीच्या मोदी सरकारला प्रभू श्रीरामाप्रमाणे वागणारे सत्यवचनी राहूल गांधी पुरुन उरले आहेत.त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या भाजपाने राहूल गांधींचा फोटो रावणाच्या रुपात कॉम्प्यूटरमध्ये एडीट करुन आपल्या सोशलमिडीयावर प्रसारीत करुन पुन्हा एकदा देशाला रावणराजची आठवण करुन दिली आहे. रावणाने ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाला त्रास दिला त्याप्रमाणे भाजपा राहूल गांधीची बदनामी करत त्रास देत आहे. अशा राक्षसप्रवृत्तीच्या रावणरुपी भाजपाचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे अध्यक्ष शाम सनेर यांनी सांगितले. यावेळी झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे धुळे जिल्हा शहर निरीक्षक हेमंत ओगले,काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे, काँगे्रसचे धुळे तालुका अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे,बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, शिरपूर तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, आसिफ खान, मोहन पाटील, मा. पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, बाजार समितीचे संचालक एन.डी. पाटील, साखरी तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, जि.प.सदस्य, प्रवीण चौरे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष हसन पठाण, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील, पं.स. सदस्य राजेंद्र देवरे, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष डाॅ.विलास बिरारी, सेवा दलाचे अध्यक्ष अलोक रघुवंशी, दीपक गवळे,डाॅ. दत्ता परदेशी, काँग्रेस उपाध्यक्ष के.डी.पाटील, ब्लॉक अध्यक्ष इम्तियाज पठाण,शिवाजी अहिरे, फैसल अन्सारी, पप्पू सहानी, आयुब खाटीक, दीपक पाटील,राजीव पाटील, भटू चौधरी, राजेंद्र खैरनार, पं.स.सदस्य दीपक कोतेकर, सोमनाथ पाटील, हिरामण पाटील, आबा पगारे, पं.स. सदस्य सुरेखाताई बडगुजर, महिला काँग्रेसच्या अर्चना पाटील, बानुबाई शिरसाठ, माधुरी निकम ज्योती इंगळे,छायाताई पाटील, सरपंच सोनीबाई भिल,राजेंद्र देवरे, कैलास पाटील, किरण नगराळे,सुनिता मांडगे,नरेंद्र पाटील,साक्री येथील विश्वास बागुल,सागर देसले,संदीप पाटील,निंबा भोये आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!