*दोंडाईचेत अप्पर तहसीलदार कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची लिपीका मार्फत लुटमार* दोंडाईंचा प्रतिनीधी गोपाल कोळी दोंडाईचा शहरातील वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांना शिधापत्रिका दुरुस्ती करणे , नविन शिधापत्रिका बनवणे , नाव दुरुस्ती करणे शिंदखेडा येथे जाणे परवडणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होईल व आर्थिक भार ही सहन करावा लागेल म्हणून मा. एकनाथ खडसे महसूल मंत्री असतानां त्यांच्या हस्ते अप्पर तहसीलदार कार्यालयाचे उद्घाटन केले पुढे स्थलांतरित होऊन अप्पर तहसीलदार कार्यालय हे जुनी नगरपालिका येथे सुरू करण्यात आले. काही महिन्यापासून कार्यालयातील लिपिक हा सर्वसामान्य माणसाची लूट करत आहे. आतापर्यंत चाळीस ते पन्नास शिधापत्रिकाधारकांचे लाच अभावी रेशन कार्ड दुरुस्ती करून देण्यास टाळाटाळ करत आहे. एका नगरपालिका कर्मचाऱ्याकडून 500 रू घेऊनही हा माजलेला लिपिक रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. नक्की या माजलेला लिपिकाला नायब तहसीलदारांचे पाठबळ असावे अशीच चर्चा गावात सुरू आहे. कुठलाही शासकीय अधिकारी, लिपिक अथवा शिपाई आपल्या कडून लाच मागत असेल तर मग ती लाच 100 रू असो अथवा 5000 रू हजाराची तो कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी अँटी करप्शन ब्युरो धुळे 02562- 234020 या नंबरावर आपली सदरील तक्रार दाखल करावी. कुठल्याही शासकीय कार्यालय , महानगरपालिका व नगरपालिका यांच्याकडे अनधिकृत नोंदणी असलेले सर्व फोन नंबर आपल्याला भेटतील .
दोंडाईचेत अप्पर तहसीलदार कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची लिपीका मार्फत लुटमार
