प्रा. भुवनेश्वरी राणे यांना पीएच. डी. पदवी प्रदान
साकेगाव येथील कै. यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील प्राध्यापक भुवनेश्वरी योगेश राणे यांना जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून ०६ ऑक्टोबर रोजी पीएच. डी. पदवीने विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समुद्र फळांमध्ये न्युरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहे हे त्यांनी संशोधन केले. सदरहू संशोधन हे मा. प्राध्यापक डॉ. व्ही. आर. पाटील मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेटंट प्राप्त झाले आहे. तसेच ओर्गानिक केमिस्ट्री या विषयावर पुस्तक लिहिले आहे. या शोधनिबंधासाठी मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी फैजपूर येथील प्राचार्य प्रा. डॉ. आर. वाय. चौधरी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि कै. यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी साकेगाव येथील प्राचार्य प्रा. डॉ. पी. आर. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या संशोधन कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पांडुरंग सराफ साहेब आणि सचिव मा. संजय इंगळे साहेब यांनी कौतुक केले.