*बिरसा फायटर्सच्या पाठपुराव्याला यश;वस्तीशाळा निमशिक्षकांचा प्रश्न सुटला!* *बिरसा फायटर्सचे मानले आभार!*नंदूरबार:वस्तीशाळा निमशिक्षकांना तात्काळ सेवेत सामावून घ्या,या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांची भेट घेत निवेदन दिले होते.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नंदूरबार जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव कोकणी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, गणेश सोनवणे,राजकुमार वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.शिक्षणाधिका-यांना लेखी पत्र द्यायला सांगतो,असे आश्वासन सीईओ यांनी दिले होते.बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांचीही भेट घेत निवेदन दिले होते. बिरसा फायटर्स संघटनेने उपोषणकर्त्यांना आमरण उपोषणाला बिरसा फायटर्स संघटनेचा पाठिंबा देत आहोत, असे पत्र दिले होते. वस्तीशाळा शिक्षक आपल्या मागण्यांसाठी कुटुंबासह दिनांक २ ऑक्टोबर २०२३ पासून जिल्हा परिषद नंदूरबार समोर आमरण उपोषणास बसले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने निमशिक्षकांना १० वर्षे सेवेपासून वंचित ठेवल्यामुळे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.तरी सदर वस्तीशाळेतील निमशिक्षकांना तात्काळ सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करावी हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार प्रशासनाला देण्यात आला होता.निवेदनाची दखल घेऊन उपोषणकर्ते शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याबाबत जिल्हा परिषद नंदूरबार प्रशासनाने लेखी पत्र दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे.या लढ्यात बिरसा फायटर्स संघटनेने वस्तीशाळा शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल शिक्षकांनी फोन व वाॅटसपद्वारे बिरसा फायटर्सचे जाहीर आभार मानले आहेत.
Related Posts
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साक्री चे क्रीडा शिक्षक श्री बन्सीलाल संतोष बागुल यांना विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साक्री चे क्रीडा शिक्षक श्री बन्सीलाल संतोष बागुल यांना विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारसाक्री…
सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप.
सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप. पनवेल (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)पनवेल तालुक्यातील धामणी येथील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयात शनिवार दिनांक…
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्याची मागणीविभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्याची मागणीविभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी हेमकांत गायकवाड,(जळगांव जिल्हा सचिव…