एम्.के.ज्.प्रस्तुत’म्युझिक मंत्रा’आयोजित”दिल से दिल मिल गये”हा संगितमय कार्यक्रम उत्साहात संपन्न ———————————————————-डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-म्युझिक मंत्राच्या’संस्थापक-संचालिका शर्मिला केसरकर या सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही कार्य करणा-या अग्रेसर महिला आहेत.म्युझिक मंत्राच्या माध्यमातून ऑर्गनाझर शर्मिला केसरकर गेली१५वर्षे आपला संगितमय कार्यक्रम(ऑर्केस्ट्रा)वेगवेगळ्या शहरात सादर करत आहेत.त्याच अनुषंगाने नुकताच डोंबिवली पुर्व येथील सर्वेश हाॅल येथे”दिल से दिल मिल गये”हा संगितमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून अजरामर मराठी-हिंदी गाणी सादर करण्यात आली.तसेच लावणी व इतरही नृत्याविष्कार सादर करण्यात आले.ऑर्गनाझर-सिंगर शर्मिला केसरकर तसेच अतुल,संजय,राजेंद्र,धनंजय,नितीन,रविंद्र,शालिनी,प्राजक्ता,माणिक,मोहना,प्रज्ञा,लावणी नृत्यांगना सोनी भोसले,आदी गायक-गायिकांनी आपल्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध केले.व्हीडीओ ग्राफर रविंद्र टिळेकर यांनी संपुर्ण कार्यक्रमाची उत्कृष्ट व्हीडीओग्रफी केली.विशेष अतिथी मोहन बडगुजर,कोऑडीनेटर गणेश मांजरेकर,म्युझिक अरेंजर रितेश भावलकर,अरविंद सुर्वे यांचे’दिल से दिल मिल गये’या संगितमय कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले.सुनिल शितोळे यांनी या कार्यक्रमाचे विश्लेषणात्मक,खुमासदार पध्दतीने सुंदर प्रकारे सुत्रसंचालन केले.याप्रसंगी डोंबिवलीत माजी नगरसेवक शिंदे गटाचे तालुका संपर्क प्रमुख महेश पाटील,जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,प्रिया समाज विकास संस्थेच्या अध्यक्षा प्रिया गायकवाड,रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे माजी अध्यक्ष दत्ता कडुलकर,ग्लोबल मालवणीचे अध्यक्ष सचिन आचरेकर,कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला सहसमन्वयक कांचन कुलकर्णी,प्रियंका सामाजिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका गवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्वांचा ऑर्गनाझर शर्मिला केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.गायक-गायिका यांनी सादर केलेल्या गाण्यांवर रसिकांनी मनमुरादपणे नाचण्याचा आनंद घेतला.डोंबिवलीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा”दिल से दिल मिल गये”संगितमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
Related Posts
तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव शहादा येथे संपन्न
*तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव शहादा येथे संपन्न* महाराष्ट्र शासन कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार अंतर्गत 9 ऑगस्ट ते 15…
दादाभाई पिंपळेच्या लेखणीतून…….”निजलेला पॅंथर
दादाभाई पिंपळेच्या लेखणीतून दुसरं कारण म्हणजेमला कोणी घोषणा देतांना बघितलं तर…..माझी नोकरी जाईल की काय? ही भिती त्याच्या मनात होती…
बदलापुरात रंगली बिजनेस कॉर्पोरेट मीटिंग..!*
*बदलापुरात रंगली बिजनेस कॉर्पोरेट मीटिंग..!* (बदलापूर प्रतिनिधी -गुरुनाथ तिरपणकर)”चला भेटूया परस्परांना ऊर्जा देऊया ” या बोधवाक्याला अनुसरून व्यावसायिक मूल्य रुजवणे…