*माहितीचा अधिकार कलम 4(1)ख ची सक्तीने अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4(1)ख या कलमाची सुयोग्य पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास विविध शासकीय कार्यालयात करण्यात येणाऱ्या माहिती अधिकार अर्जांची संख्या अत्यंत कमी होऊन नागरिकांच्या दृष्टीने अतीशय उत्तम कार्य होईल. यासंदर्भात शासनाने वेळोवेळी अनेक परिपत्रक काढलेले आहेत, तरीदेखील संबंधित अधिकाऱ्यांनी या कलमाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने केलेली नाही. तरी या कलमाची अंमलबजावणी सुयोग्य पद्धतीने व्हावी , याकरिता जळगावचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांना आज याबाबतचे निवेदन देऊन चर्चा करतांना माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , माहिती अधिकार प्रशिक्षक प्रा. अशोक पवार सर , लोक संघर्ष मोर्चाचे सचिनदादा धांडे, भरत कर्डिले , छावा मराठा युवा महासंघाच्या महिला आघाडी महानगर अध्यक्षा सौ. निलूताई इंगळे , सौ. विद्याताई झनके, श्रीमती विमलताई वाणी , उज्वल पाटिल , अजय मनुरे .
माहितीचा अधिकार कलम 4(1)ख ची सक्तीने अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
