*जिव्हाळा कोळी समाज संघटना व कोळी समाज सेवाभावी संस्था नंदुरबार कडुन दि.१७ /१२/ २०२३ मा. रोजी धुळे एकविरा देवी मंदिर ते मुबई मंत्रालय पायी पदयात्रा मोर्चाला जाहिर पाठिंबा*
( प्रतिनीधी गोपाल कोळी )दोंडाईंचा ता. राज्य शासनाकडून गेल्या 40 ते 45 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी आणि इतर आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार केला जात आहे. आणि हा अन्याय अत्याचार दूर व्हावा व न्याय मिळावा. यासाठी अन्यायग्रस्त समाजामार्फत अनेक प्रकारचे आंदोलने, उपोषण, मोर्चा शासनाविरोधात पुकारण्यात आलेत. परंतु शासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही. उलट अन्यायाची तीव्रता वाढत गेली. यासाठी आदिवासी वाल्मिक लव्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. शानाभाऊ सोनवणे. यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 17 नोव्हेंबर 2023 पासून धुळे ते मंत्रालय मुंबई पर्यत संघर्ष पदयात्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरचे आंदोलन हे समाज हिताचे असून, समाजाला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात हा योग्य मार्ग आहे. सदरच्या आंदोलनाला व माननीय शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिव्हाळा फांऊडेशन महाराष्ट्र संचलित.. जिव्हाळा कोळी संघटना महाराष्ट्र चे सर्व पदाधिकारी व कोळी समाज सेवाभावी संस्था नंदुरबार चे समाज बांधव जाहीर पाठिंबा घोषित करत आहेत. तसेच या संघर्ष पदयात्रेत आमचा आपल्या सोबत सहभाग असेल. असे जाहीर करण्यात येत आहे.