आदिवासी महिलेला जीवे ठार मारण्यासाठी बेदम मारहाण करणा-या आरोपींना तात्काळ अटक करा: बिरसा फायटर्सची मागणी**धडगाव पोलीस निरीक्षकांना बिरसा फायटर्सचे निवेदन*

*आदिवासी महिलेला जीवे ठार मारण्यासाठी बेदम मारहाण करणा-या आरोपींना तात्काळ अटक करा: बिरसा फायटर्सची मागणी**धडगाव पोलीस निरीक्षकांना बिरसा फायटर्सचे निवेदन* धडगाव: यमुना गुलाबसिंग पावरा ह्या आदिवासी महिलेस जीवे ठार मारण्यासाठी बेदम मारहाण करणा-या आरोपींना तात्काळ अटक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,जिल्हाध्यक्ष भरत पावरा,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जलिंदर पावरा,जिल्हा संघटक यशवंत पाडवी,धडगाव सचिव राजेंद्र पावरा,धडगाव सल्लागार जितेंद्र पावरा,अनिल वळवी आदिंनी सह्या केल्या आहेत.निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक नंदूरबार यांनाही पाठविण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ०४/१०/२०२३ आदिवासी महिला,अंगणवाडी मदतनीस तथा फिर्यादी सौ. यमुनाबाई गुलाबसिंग पावरा राहणार खरवड ,बारीपाडा यांना अंगणवाडी केंद्रा जवळ राहणारे आरोपी १) लेहऱ्या पाडवी २) दशरथ लेहऱ्या पावरा ३) टापऱ्या आंदाऱ्या पावरा ह्या तीन जणांनी सकाळी ९ ते १० वाजे दरम्यान अश्लील शिवीगाळ करीत बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.अंगणवाडी केंद्रामध्ये जमुनाबाई ह्या झाडू मारत असताना आरोपी तीन जण आले आणि दरवाजाची कडी बंद करून” तु माझी पत्नी आहे का? माझी पत्नीस येथे काम करेल! तु इथे यायचं नाही, येथे माझी पत्नीस काम करेल, अशी अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केली .सदर तीन जणांनी बेदम मारहाण केल्यामुळे जमुनाबाई जागेवरच बेशुद्ध पडल्या.आरोपींविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३५४अ,३५३,३३२,३२४,३२३,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरी पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नाही,ही गंभीर बाब आहे. आरोपींकडून फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका आहे,आरोपींकडून पुन्हा अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार धडगाव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिस हे राहतील. म्हणून घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी,ही विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून धडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारासुद्धा बिरसा फायटर्स संघटनेने पोलीस प्रशासनास दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!