मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे कार्यालयासाठी धरणे- आंदोलन.

*मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे कार्यालयासाठी धरणे- आंदोलन. !* मुंबई (गुरुनाथ तिरपणकर)अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या कार्यालयाला महापालिकेने काठून घेतल्यामुळे संस्था गेल्या ४ वर्षांपासून बेघर झाली आहे, २०१६ पासून सर्व पक्षीय सत्ताधारी, पालिका प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या गाठीभेटी, पत्रव्यवहार करूनही आश्वासनापलीकडे कुणीही दाद घेत नव्हते, त्याविरोधात दाद मागण्यासाठी विविध भागातून ज्येष्ठ, युवा वृत्तपत्र लेखक जुने कार्यालय असलेल्या दादर येथील शिंदेवाडी महापालिका शाळेसमोर एकत्र आले होते, आमदार कालिदास कोळंबकर यांनी या धरणे-आंदोलनाला तातडीने भेट दिली आणि संबंधितांशी संपर्क साधून कार्यालय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल रहाण्याचे त्याचबरोबर माझ्या मतदार संघातील जनसामान्यांचे प्रश्न निस्वार्थीपणे आणि निर्भीडपणे वर्तमानपत्रातून लिहिणारी महाराष्ट्रातील ही महत्वाची वृत्तपत्र लेखक चळवळ सुरु राहण्यासाठी मी तातडीने संबधीतांशी पोहोचून प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. यावेळी रवींद्र मालुसरे (अध्यक्ष ), प्रशांत घाडीगावकर (प्रमुख कार्यवाह), कार्यवाह नितीन कदम, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड आणि संघाचे माजी अध्यक्ष विजय ना कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक कृष्णा काजरोळकर, मनमोहन चोणकर, कृष्णा ब्रीद,प्रकाश बाडकर, सूर्यकांत भोसले, दिलीप ल सावंत, गुरुनाथ तिरपणकर, दिगंबर चव्हाण, विवेक तवटे, राजन देसाई,अब्बास अत्तार, चंदन तावडे, रामचंद्र जायसवाल, दिलीप दळवी, दादासाहेब येंधे,अर्जुन जाधव,प्रशांत भाटकर,रमेश पालकर आदी वृत्तपत्र लेखक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!