कृषी विभागामार्फत वनराई बंधारे बांधण्यात आले असून पाणी आडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

मौजे लंगडी भवानी तालुका शहादा येथे कृषी विभागामार्फत वनराई बंधारे बांधण्यात आले असून पाणी आडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला वनराई बंधाऱ्यामुळे पाणी जमिनीत मुरते आसपासच्या विहिरीचे व उपनलिकेचे पाणीही वाढते तसेच भूगर्भातील पाण्याची वाढ होण्यास मदत होते रब्बी पिकाला संरक्षित पाणी उपलब्ध होऊन स्थानिक रोजगार निर्मितीत वाढ होते राज्यात उद्भवणारे पाणीटंचाई संकट किमान एक दोन महिने लांबविण्यासाठी साखळी पद्धतीने लोकसहभागातून वनराई बंधारे सहाय्यभूत ठरते गावातील पाळीव जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते. सदरील कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे,गावाचे सरपंच सौ प्रीती निलेश पावरा,उपसरपंच ताराचंद मोते, ग्रामसेवक वाय.एस.चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, कमल डुडवे,यशवंत चव्हाण,जतन पावरा, ग्रामपंचायत शिपाई सिताराम पावरा, अशोक मोते,विक्रम पावरा, रोजगार सेवक किरण पावरा,आदर्श हायस्कूल शिक्षक वृंद नववी दहावी मुलं तसेच प्रभारी मंडळ कृषी अधिकारी श्री एकनाथ सावडे,कृषी पर्यवेक्षक श्रीमती बी आर पावरा,कृषी सहाय्यक अर्जुन पावरा,कल्याण पवारा, भाग्यश्री पावरा, दीपाली खर्डे,अंजली चव्हाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!