सारंगखेडा पूलाच्या दुरावस्थेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन सादर.

सारंगखेडा पूलाच्या दुरावस्थेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन सादर.शहादा,दि.17(का.प्र.) शहादा-दोंडाईचा रस्त्यावरील सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे करणाऱ्या कंत्राटदार व संबधित तत्कालीन अधिकाऱ्यांसह पुलाचे धोकेदायक स्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबधित अधिकारी यांची चौकशी होऊन कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनलेश जायसवाल व तालुकाध्यक्ष मदन पावरा यांनी जिल्हाधिकारींसह पालकमंत्री ना.अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. श्री.जायसवाल व श्री.पवार यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, नंदुरबार जिल्हयातील सारंगखेडा ता. शहादा येथील तापी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीसह पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंतीचे काम करण्यासाठी २०१४-२०१५ व २०१७-२०१८ या वर्षात दोन कामांवर सुमारे ४ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. परंतु संबंधित कंत्राटदार व कामावर देखरेख करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग शहादाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता व सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी-१ यांनी संगनमत करुन योग्य काम नकरता अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळेच सदर काम अवघ्या ५/७ वर्षातच जमीनदोस्त झाले आहे.२०१४-२०१५ या वर्षात ३०५४ मार्ग व पुल देखभाल व दुरुस्ती(गट-क)व निविदा सोनगीर दोंडाईचा शहादा की.मी. ७०/३०० मधील सारंगखेडा येथील तापी पुलाची दुरुस्ती करणे प्ररामा १ ता. शहादा जि.नंदुरबार विंग बॉल व बि.टी. वर्क्स या कामासाठी सुमारे १ कोटी १९ लाख खर्च दाखविण्यात आले आहेत. सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि योग्य मानकानुसार केले गेलेले नाही. त्यामुळेच अत्यंत कमी पाण्याचा प्रवाह असतांना सुद्धा पाण्यात भराव व संरक्षक भिंत खचून वाहून गेली आहे. या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे तापी नदीला मोठा पूर आलेला नव्हता तरीही केलेले काम वाहून जाणे हे झालेले काम हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झालेले होते दर्शविणारे आहे.२०१८-२०१९ या वर्षात ३०५४ मार्ग व पुल देखभाल व दुरुस्ती (गट-क) ब – २ निविदा सोनगीर दोंडाईचा शहादा धडगांव रस्ता प्ररामा-१ वरील सारंगखेडा गांवाजवळील मोठ्या पुलाची दुरुस्ती करणे (पुलाच्या टाकरखेडा बाजूकडील अॅबटमेंट भोवती संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी सुमारे ३ कोटी ५४ लाख रुपये खर्च दाखवण्यात आले आहेत. सदर काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाल्यामुळे अवघ्या ४/५ वर्षातच कामाला मोठमोठे तडे जाऊन जमीनदोस्त झाले आहे. अॅबटमेंटचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे व तकलादू केल्यामुळे पुलाच्या अॅबटमेंटचे कामाला मोठं-मोठे तडे गेले होते. सदर गंभीर बाब असुन अॅबटमेंटच्या कामाला तडे गेल्यामुळे पुल ८/१० मीटर खचला होता. सुदैवाने वेळीच लक्ष गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे.वरील दोन्ही कामे योग्य मानकानुसार व मंजुर निविदेप्रमाणे झाले असते तर कामाला तडे भगदाड पडून जमीनदोस्त झाले नसते. सुमारे ७० वर्षापूर्वी बांधलेला पुल जैसेथे स्थितीत आहे. ५/७ वर्षा पुर्वी केलेले काम जमीनदोस्त होऊन जनतेने कर रुपाने शासनाला दिलेल्या करोडो रुपये पाण्यात वाहून गेले आहेत. यात काम करणारे ठेकेदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग शहादाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहादाचे तत्कालीन उपविभागीय उपअभियंता व सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहादाचे सहाय्यक अभियंता श्रेणी-१ आगोदर सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा हेच शंभर टक्के जबाबदार आहेत.सदर रस्ता व पुल सस्थितीत कार्यकारी अभियंता. राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांच्या कडे हस्तांतरित झालेले आहे. सदर विभागाने वेळेवेळी स्ट्रक्चरल ऑडीट (संरचनात्माक परीक्षण) केले होते की नाही ? याबाबत शंका निर्माण झालेली आहे. स्ट्रक्चरल ऑडीट (संरचनात्मकपरीक्षण) केले नसेल तर कां केले गेले नाही?तसेच स्ट्रक्चरल ऑडीट (संरचनात्माक परीक्षण) केले गेले असेल तर पुलाचा भराव व संरक्षक भिंत पडण्याअगोदर धोकेदायक स्थिती निर्माण झाली असतांना सुद्धा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का केले गेल? उपाय-योजना का केली गेली नाही? याबाबत चौकशी होणे आवश्यक असून पुलाच्या धोकेदायक स्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबधितावर योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे. स्थानिक वृतपत्रात वेळेवेळी याबाबत वृत्त प्रकाशित झालेले असतांना सुद्धा या गंभीर बाबी कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले असल्याचे दिसून येत आहे. पुल धोकादायक स्थितीत असतांना सुद्धा या गंभीर बाबी कडे दुर्लक्ष करणान्या राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळेचे संबधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.या निवेदनाद्वारे जिल्हयाचे प्रमुख या नात्याने आपणांस विनंती करितो की, वरील पुलाच्या दोन्ही कामांवर शासनाचे करोडो रुपये खर्च दाखवून पुलाचे दुरुस्ती व संरक्षक भिंतीचे काम निकृष्ठ व दर्जाहीन करणाऱ्या कंत्राटदार तसेच कामावर देखरेख करणाऱ्या तत्कालीन अधिकान्यांकडून सदर झालेला खर्च व्याजासकट वसूल करण्यात यावे तसेच बोगस व तकलादू काम करणारे कंत्राटदार व निकृष्ठ व दर्जाहीन कामाला अभय देणान्यांवर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्यथा भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे संपूर्ण नंदुरबार जिल्हयात प्रखर आंदोलन छेडले जाईल यांची दक्षता घ्यावी. होणाऱ्या आंदोलनामुळे कायदा- सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार व प्रशासनच जबाबदार राहील यांची नोंद घ्यावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!