विद्याश्रम ॲकॅडमी लोणखेडा यांच्या मार्फत रनिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली

विद्याश्रम ॲकॅडमी लोणखेडा यांच्या मार्फत आज१७/१०/२०२३रोजी रनिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात प्रमुख अतिथी म्हणून शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आदरणीय छगन चव्हाण व अभिजीत अहिरे तसेच अनिल पावरा पोलीस कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामध्ये मुलींसाठी तीन किलोमीटर मुलांसाठी पाच किलोमीटर व सोळाशे मीटर यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय असे नंबर काढण्यात आले त्यामध्ये सर्वप्रथम मुलींचे ३(तीन) किलोमीटर स्पर्धा घेण्यात आली प्रथम क्रमांक कविता पावरा ११: ४८मिनीट , द्वितीय क्रमांक तुलसी शेमले १२:०७ मिनिट, तृतीय क्रमांक ज्योती पावरा१२:२८ मिनिट,मुलांसाठी ५(पाच) किलोमीटर व १६००(सोळाशे) मीटर अशा तीन ही गटांचा विद्यार्थ्यांच्या सत्कार शहादा येथील पोलीस उपनिरीक्षक आदरणीय छगन चौहान यांच्या हस्ते करण्यात आले व मुलांसाठी ५(पाच) किलोमीटर स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आला प्रथम क्रमांक विलास तडवी १६: १८मिनिट ,द्वितीय क्रमांक श्यामसिंग वसावे १६: २६मिनिट व तृतीय क्रमांक राजेश पावरा १६: १८मिनिट यांचे स्वागत शहादा येथील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले १६००(सोळाशे) मीटर स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले त्यामध्ये प्रथम क्रमांक गजानन पावरा ०४: ५२मिनिट द्वितीय क्रमांक तेरसिंग पावरा ०४:५६ मिनिट तृतीय क्रमांक रिकीपॉंटिंग वसावे०४:५७ मिनिट यांचे सुद्धा सत्कार शहादा पोलीस उपनिरीक्षक छगन चौहान यांनी केले बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानंतर पोलीस उपनिरीक्षक छगन चौहान यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधुन व मार्गदर्शन केले स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी व तयारी करताना येणाऱ्या अडचणी त्यावर कसे मात करावे यावर छगन चौहान यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले तसेच त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत संवादाच्या माध्यमातून व प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन केले व भविष्यात चांगल्या प्रकारे अभ्यास करून एक चांगली नागरिक व अधिकारी घडवावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली तसेच कार्यक्रमाच्या समारोप विद्याश्रम अकॅडमी चे संस्थापक व अध्यक्ष आदरणीय प्रा. दिनेश पावरा सर व त्यांचे सहकारी फिजिकल ट्रेनर किसन पावरा सर उपस्थित होते व कार्यक्रमाची सांगता प्रशांत दहीकर सर यांच्या हस्ते करण्यात आली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!