नेर येथे वधू वर परिचय मेळावाची बैठक उत्साहात संपन्न

*नेर:* *नेर येथे वधू वर परिचय मेळावाची बैठक उत्साहात संपन्न* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे आज दिनांक १९ ऑक्टोंबर २०२३ गुरूवार रोजी नेर येथील महर्षी वाल्मिकी ऋषी (भवन) मंदिरात वर वधू पालक गेट टू गेदर मेळावा बाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली.तसेच समस्त नेर गावातील वाल्मिकी बांधव व ज्येष्ठ मार्गदर्शक नागरिकच्या सहमतीने एक मुखाने वधू वर परिचय मेळावा घेण्या साठी ठराव मंजूर करण्यात आला.व मिटिंग मोठ्या उत्साहात संपन्न झाली.तसेच येत्या १९ नोव्हेंबर २०२३ रोजी आपल्या नेर गावातील महर्षी वाल्मिकी ऋषी भवन येथे वधू वर गेट टू गेदर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.तसेच वधुवर परिचय मेळाव्याचे प्रसारण हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व कोळी समाज बांधवांनी करावे असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे.यावेळी तुकाराम जाधव (बापू साहेब) कुसुंबा, गिरधर महाले अप्पासाहेब धुळे, दिलीप बागुल सर धुळे, सुभेदार दगा दादा मोराणेकर, विनय आखडमल, अविनाश शिरसाठ, कुसुंबा तसेच जेष्ठ मान्यवर नेर येथील ट्रस्टचे मुख्यपद अधिकारी पंचकमेटी, अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य व नेर येथील सर्व कोळी समाज बांधव तरुण तडपदार मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!