नागपुर ची प्रणिमित्र चैताली भस्मे यांनी आपला वाढदिवस केला गरजू निराधार वृद्ध महिलांसोबत

*नागपुर ची प्रणिमित्र चैताली भस्मे यांनी आपला वाढदिवस केला गरजू निराधार वृद्ध महिलांसोबत*आजकल च्या जगात वाढदिवास साजरा करने म्हणजे पैशाची उधलळपट्टी, डीजे आणि डोळे दिपवणारी रोषणाई एक मेकांवर केक फेकणे आणि चेहऱ्याला केक फासने.. यासर्व गोष्टींमधे पैशांची विनाकारण नासाडी होते त्यातच नागपूर मधे अशी पण एक व्यक्ती आहे जी दर वर्षी आपला वाढदिवस निराधार ,गरजू,वृध्दाश्रम,अनाथ आश्रम किंवा फुटपाथ वर वास्तव्य करणार्या अनाथ मुलांसोबत आश्रमात त्यांच्या सोबत साजरा करते ज्यांचे या जगात कोणी च नाही .दर वर्षी प्रमाणे याही वर्षी नागपूर च्या प्राणीमित्र ,सर्पमित्र , वन्यजीव रक्षक,आणि मांगल्य संस्थे च्या अध्यक्षा चैताली भस्मे यांनी आपला वाढदिवस नालंदा वृध्दाश्रम , राणी दुर्गावती चौक,इथे निराधार गरजू ,वृध्द महिलांना अन्नदान करून त्यांना केक भरउन त्यांच्यासोबत वेळ घालउन साजरा केला मांगल्य फाऊंडेशन च्या द्वारे आजपर्यंत चैताली ने अनेक भटकलेल्या वृध्द लोकांना रस्त्यावरून उचलून त्यांच्या घरी पोचवण्यात मदत केली आहे समाजासाठी त्यांचा हाच संदेश आहे की मुक्या प्राण्यांची आणि निराधार गरजू लोकांची सेवा हीच खरी ईश्वराची पूजा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!