नेर: धुळे तालुक्यातील सर्व नादुरुस्त, बंद व इतर मोठे पाट,पाटचाऱ्या, उपचाऱ्या खूप नादुरुस्त झाल्याअसून त्या कोरून दुरुस्त करण्यात याव्या अशी मागणी शेतकऱ्यांसह भाजपा पदाधिकारी यांनी माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे केली होती.त्या अनुषंगाने काल मा.जिल्हाधिकारी अभिनव गोयल,मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता,पाटबंधारे चे वट्टे साहेब, पी जी पाटील साहेब व इतर सर्व अधिकार्यांची खासदार सुभाष भामरे यांनी बैठक घेऊन उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तापी खोऱ्याचे मुख्य अभियंता श्री खडसे साहेब व पाटबधारे मंत्री यांचाशी संपर्क करुण यांच्याशी संपर्क करून सदर सर्व चाऱ्या दुरुस्त करण्याचे त्वरित आदेश दिले.
यासंदर्भात काल दिनांक 29/10/२023 रोजी 12:30 वाजता उजव्या कालव्याच्या देऊर बु येथिल 8 नंबर पाट्चारीवर खासदार डॉ. सुभाषजी भामरे यांच्या हस्ते चारी कोरण्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी खासदार यांनी सांगितले की, तालुक्यातील सर्व चाऱ्या कोरण्यासाठी प्रयत्नशील असून आता 2 जेसीबी उपलब्ध असून लवकरच अजून 2 जेसीबी उपलब्ध होणार आहे म्हणून टंचाई निवारण्यास मदत होणार आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे,माजी कृषी सभापती संग्राम पाटिल जि.प.सदस्य राम भदाणे,भाजपा नेते उत्कर्ष पाटील,जि.प.सदस्य आशुतोष पाटील,जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले,तालुका अध्यक्ष दिनेश परदेशी,देवेंद्र पाटील,प्रकाश खलाणे,आर डी माळी, गुलाबराव बोरसे,पवन कोळी,संजय सैंदाणे, अमोल माळी,साहेबराव गवळे,उमेश जयस्वाल, सौरव विभांडिक,डॉ.दिनेश नेरकर,अर्जुन गायकवाड,अविनाश पाटील,सुरेश सोनवणे,गोविंद सोनवणे व भदाण्याचे सरपंच भीमा कर्नर,दिपक मोरे,सागर देवरे,गणेश पाटील,चुडामन महाले,गणेश देसले,आबा शेवाळे,नाना बोढरे,पोपटराव माळी,राजाराम बोढरे,अनिल सुर्यवंशी गुलाब कोळी,शिवाजी देशमुख,आदी उपस्थित होते.