जळगाव जिल्हाधिकारी कार्यलय समोर उपोषण कर्त्या महिलेची प्रकृती खालावली

जळगाव जिल्हाधिकारी कार्यलय समोर उपोषण कत्या महिलेची प्रकृती खालावली जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० ऑक्टोबर पासून आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी समाज बांधव जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता मिळविणेसाठी २३ दिवसापासून अन्नत्याग सत्याग्रह आमरण उपोषण चालू आहे. याकडे शासन संबंधित उपोषण कर्त्याच्या मागणी कडे मुद्दाम दुर्लक्ष करीत होत असल्यामुळे एका महिलेची प्रकृती खालावली आहे. गेल्या २३ दिवसा पासून आदिवासी कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र बाबत ६ पुरुष व २ महिलांनी अन्नत्याग सत्याग्रह आदोलन सुरु असून याकडे शासन हेतुपुरुस्कर दुर्लक्ष करीत आहे.उपोषण स्थळी विविध मंत्री ,आमदार ,खासदार,सामाजिक संघटना जाहिर पाठीबा देत आहे.उपोषण कर्यांची तब्येत खालावले असून एका महिलेची प्रकृती खालावली आहे. जिल्हाधिकारी उपोषण कत्याची अद्यापही भेट घेतली नसल्यामुळे उपोषण कर्ती महिलेची तब्बैत खालावली असून जिल्हाधिकारी येत नाही तो पर्यत उपचार घेणार नाही, माझी तब्बैत खालावत असून बरे वाईट झाल्यास यावर शासन जबाबदार राहणार असे उपोषण कर्ती महिलेने हातामध्ये कादग पेन घेऊन हात थरथर कापत मनातील भावना उपस्थित समाजा समोर माडल्या आहे.२३ दिवसा पासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरु असून याकडे जिल्हाधिकारी सह तीन मंत्री असूनही समाजाच्या प्रशन मार्गी लागत नसल्यामुळे आदीवासी कोळी समाज आक्रमक भुमीका घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!