थोरगव्हाण ग्रामपंचायतवर ग्रामविकास पँनलचा झेंडा मनवेल ता.यावल : यावल तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या थोरगव्हाण येथील ग्रामपंचायत निवडणूकीचा चुरशीचा निवडणूकीत ग्रामपंचायतच्या लोकनियुत्त सरपंच सह सहा सदस्य निवडुण आले तर गाव बचाव पँनलच्या तीन जागा निवडुन आल्या आहेत.लोकनियुक्त सरपंच पदासाठी मनिषा समाधान सोनवणे व उषाबाई चौधरी यांचात सरळ लढत होती यात मनिषा समाधान सोनवणे १४१ मतांनी निवडुन आल्या.नऊ ग्रामपंचायत सदस्य करीता १८ उमेदवार रींगणात होते तर यात मिनाबाई भरत चौधरी बिनविरोध निवडुन आल्या होत्या यात सदस्य पदी ग्राम विकास पँनलचे वंदना बापु भालेराव (२४३),अनिल कडु भालेराव (२३७),लताबाई भाऊलाल पाटील (३२१) ,सुर्यभान चावदस पाटील (२८२) मते मिळाली तर सरुबाई काशीनाथ पाटील (२३७) ,सरला कीशोर पाटील (२७२) व चद्रकांत रामसिंग पाटील (२६६) गाव बचाव पँनलचे सदस्य निवडुन आले आहे. थोरगव्हाण ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी सौ,मनिषा समाधान सोनवणे यांची निवड जाहिर होताच एकच जल्लोष झाला.समाधानभाऊ सोनवणे मित्र परीवार मार्फत सर्व सदस्सांची मिरवणूक काढण्यात आली.
थोरगव्हाण ग्रामपंचायतवर ग्रामविकास पँनलचा झेंडा
