सा.भगवे वादळच्या द्वितीय वर्धापनदिनी जनजागृती सेवा संस्था”संत गाडगेमहाराज सेवाभावी संस्था पुरस्काराने”सन्मानित

सा.भगवे वादळच्या द्वितीय वर्धापनदिनी जनजागृती सेवा संस्था”संत गाडगेमहाराज सेवाभावी संस्था पुरस्काराने”सन्मानित ———————————————————-मुंबई-सा.भगवे वादळ या वृत्तपत्राने आपली दोन वर्षाची देदीप्यमान वाटचाल यशस्वीरित्या पुर्ण केली.आणि५नोव्हेंबर या रंगभूमीदिनी सा.भगवे वादळचा द्वितीय वर्धापनदिन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या,सुरेंद्र गावस्कर सभागृह,दादर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली तीन वर्षे जनजागृती सेवा संस्था पत्रकारिता,सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,पुरस्कार सोहळा,विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले.संस्थेने कल्याण,डोंबिवली,बदलापुर,टीटवाळा,अंबरनाथ,मुंबई,पनवेल,कर्जत,चिपळुण,पुणे,कणकवली,मालवण या ठीकाणी सामाजिक उपक्रम राबवुन संस्थेचा विस्तार केला.भविष्यात जनजागृती सेवा संस्थेचा इतरही जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम घेण्याचा मानस आहे.संस्थेच्या या सर्वकश उत्कृष्ट कामगिरीची दखल सा.भगवे वादळचे संपादक दत्ता खंदारे यांनी घेतली.त्या अनुषंगाने सा.भगवे वादळाच्या द्वितीय वर्धापनदिनी दै.प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर,जेष्ठ साहित्यिक प्रा.डाॅ.राम नेमाडे,माजी शिक्षणाधिकारी डाॅ.जे.आर. केळुसकर, लावणी सम्राज्ञी नेहा पाटील,अभिनेत्री लक्ष्मी पाटील-गुप्ता, साहित्यिक-कवी विलास खानोलकर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,पदाधिकारी महेश्वर तेटांबे,जनजागृती सदस्या सौ.प्रियंका गवंडे आदरपुर्वक स्विकारला.यावेळी संपादक दत्ता खंदारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष लिंबोरे पाटील यांनी केले.आभार दिलीप गाडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत सावंत,विलास देवळेकर,दिलीप शेडगे,सुनिर्मल फाऊंडेशन,सा.भगवे वादळचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.जनजागृती सेवा संस्थेला संत गाडगेमहाराज सेवा भावी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!