दादर येथे शिवशंकर भंडारे महात्मा जोतिबा फुले शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

*दादर येथे शिवशंकर भंडारे महात्मा जोतिबा फुले शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित**माजलगाव-* येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक शिवशंकर भंडारे यांना, धारावी , दादर (पूर्व) , मुंबई येथून प्रकाशित होणारे, जनसामान्यांचा आरसा व हिंदुत्वाचा वारसा असलेल्या साप्ताहिक भगवे वादळ चा महात्मा जोतिबा फुले शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथे दत्ता खंदारे यांनी सुरुवात केलेल्या साप्ताहिक भगवे वादळ च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात समाजातील साहित्य, पत्रकारिता, शिक्षण , सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांचा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जे. आर. (शिक्षणाधिकारी मुंबई), विलास खानोलकर ( जेष्ठ मराठी साहित्यिक) , सनीभूषण मुणगेकर (अभिनेता- मुंबई) , नेहा पाटील (लावणी सम्राज्ञी मुंबई), लक्ष्मी गुप्ता पाटील (अभिनेत्री), राम नेमाडे (जेष्ठ मराठी लेखक, मुंबई) इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शिवशंकर भंडारे यांना महात्मा फुले शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवशंकर भंडारे यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ हेमंत वैद्य, प्रा चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश दुगड, अमरनाथ खुर्पे, विष्णुपंत कुलकर्णी, स्थानिक संस्था सभासद प्रशांत भानप, शाळेचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक विठ्ठल काळे, पर्यवेक्षक रवींद्र खोडवे, सदाशिव ढगे, सुर्यकांत उजगरे, कमलाकर झोडगे, कार्यालय प्रमुख संतोष लवडकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!