*नेर:* *नेर येथे आदिवासीं टोकरे कोळी वधु वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न:*
*नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे दिनाक-१९/११/२३ रोजी रविवार पांझरा नदीच्या काठी हिरण्यमय वातारणात असलेले महर्षी वाल्मिकी ऋषी (मंदीर)भवनात आदिवासी टोकरे कोळी वधु वर परिचय पालक गेट टु गेदर मेळावा उत्साहात संपन्न झाला.तसेच आधुनिक युगात धावपळीच्या व जीवनात एक सुवर्णसंधी म्हणून एक छोटासा प्रयत्न मुला मुलींसाठी वधु वर पालकांना विवाहसाठी आमंत्रण येत असले तरी इच्छित स्थळी जाण्यासाठी वेळ मिळत नाही.म्हणून हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.तसेच नोकरी वर्गाना सुट्टी मिळत नाही व शेतकरी वर्ग बांधवांच्या व्यापात जमत नाही.तसेच यासाठी एकच उपाय म्हणजे वधु वर पालक गेट टू गेदर एक छताखाली अनेक वधू वर पालक यांनी हजेरी लावली होती.तसेच नेर येथील गावातील सुप्रसिध्द महर्षी वाल्मिकी ऋषी (मंदीर)भवनात वधू वर परिचय पालक मेळावा भरण्यात आला होता. तसेच सकाळी ठीक ११ वाजता दीपप्रज्वलन हे पंच कमिटी व ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते करून कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने सुरुवात करण्यात आली होती.तसेच या मेळाव्यात नववधू,वर पालक यांचा परिचय स्टेजवर एका साईटला मुलं व एका साईटला मुली बसवून एकमेकांच्या परिचय देण्यात आला होता.तसेच धुळे,नंदूरबार,जळगाव,नाशिक या जिल्ह्यातील देखील आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव महीला भगिनी आपल्या वधू वर मुलामुलींना सोबत घेऊन या वधु वर परिचय मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते.तसेच नेर,जुने भदाणे कुसुंबा,आनंदखेडे,मोराणे व आजूबाजूच्या परिसरातील भागातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.हा मेळावा वधू वर पालकांचा असुन या कार्यक्रमात ७५ मुले व ३० मुली यांनी आपला परिचय देण्यासाठी सहभागी झाले असून कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात पार पडला.तसेच वधू वर परिचय मेळाव्यामध्ये बाहेर गावाहून आलेले मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था ही नेर येथील महर्षी वाल्मिक ऋषी ट्रस्ट कोळी समाज बांधवांकडून करण्यात आलेली होती.व आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव व यंदा कर्तव्यें आहे.या ग्रुपच्या माध्यमातून नेर,कुसुंबा,आनंदखेडे,मोराणे (अकलाड) जुने भदाणे व समस्त कोळी समाज बांधव यांचे संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम असून या कार्यक्रमांमध्ये नेर येथील आजी माजी पंचकमिटी अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य,महर्षी वाल्मीक ऋषी मित्र मंडळ तरुण,तरुणी,महिला भगिनी,ज्येष्ठ नागरिक नेर ग्रामस्थ सरपंच,सदस्य,आजी माजी नेर गटातील जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थितीत व आदिवासी टोकरे कोळी समाजातील जेष्ठ मान्यरांची उपस्थितीत कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात पार पडला.