महामार्ग पोलीस केंद्र, शिरपूर तर्फे आज जागतिक स्मरण दिनानिमित्ताने रस्ते अपघातामधील पिडीत व्यक्तींच्या स्मरणार्थ जनजागृती व कायदेविषयक शिबिर संपन्न
महाराष्ट्राचे महामार्ग विभागाचे प्रमुख मा. श्री. डॉ. रविद्रकुमार सिंगल, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य- मुंबई, मा. श्री. डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, ठाणे, मा. श्री. प्रदिप मैराळे, पोलीस उपअधीक्षक, महामार्ग पोलीस विभाग, नाशिक यांचे निर्देशानुसार रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या, गंभीर जखमी झालेल्या अपघातामध्ये अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच अपघातातील पिडीतांच्या कुटुंबियांच्या सात्वनाकरीता तसेच त्यांना कायदेशिर मार्गदर्शनाकरीता सामाजिक जबाबदारी म्हणुन दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील ०३ रा रविवार हा जागतिक स्मरण दिन म्हणून पाळण्यात येतो. तरी दिनांक १९/११/२०२३ रोजी जागतिक स्मरण दिन पाळण्यात येत असुन महामार्ग पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडुन सदर दिनाचे औचित्य साधुन दिनांक १९/११/२०२३ ते २४/११/२०२३ पर्यंत रस्ते अपघाताबाबत विविध जगजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.म्हणून महामार्ग पोलीस केंद्र, शिरपुरकडुन दि. २३/११/२०२३ रोजी ११.३० वाजता सारंगेश्वर महादेव मंदिर, आमोदे, ता. शिरपुर, जि. धुळे येथे रस्ते अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या, गंभीर जखमी, अपंगत्व आलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच त्यांच्या कायदेशिर मार्गदर्शनासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमांत मा. श्री. प्रदिप मैराळे, पोलीस उपअधीक्षक, महामार्ग पोलीस विभाग, नाशिक, मा. श्री. हेमंतकुमार भामरे, महामार्ग विभाग धुळे, अॅड. शातांराम काशीराम महाजन, बार असोसिएशन अध्यक्ष, शिरपुर, ता. शिरपुर, जि. धुळे, अँड. शिवाजी एन राजपुत व प्रविण जे. पाटील, मोटार अपघात दावा हाताळणारे तज्ञ वकील, शिरपुर, ता. शिरपुर, जि. धुळे, पो.उप.नि. एम. आय. मिर्झा, प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस केंद्र, शिरपुर, पो.उप.नि. भुषण पाटील, पोलीस अंमलदार तसेच अपघातातील पिडीत तसेच जखमी व्यक्तीचे नातेवाईक व मृत्युंजय दुत उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मा. श्री. प्रदिप मैराळे, पोलीस उपअधीक्षक, महामार्ग पोलीस विभाग, नाशिक, मा. श्री. हेमंतकुमार भामरे, महामार्ग विभाग धुळे यांनी उपस्थित नागरिकांना महामार्गावर वाहन चालवितांना आपले वाहन हे वेग मर्यादित वाहन चालविणे, दुचाकी चालक यांनी हेल्मेट परिधान करणे, दारु पिऊन वाहन चालवु नये, मोबाईल फोन वाहन चालवितांना वापर करू नये कारचालकांनी सिट बेल्टचा वापर करावा तसेच अॅड. शातांराम काशीराम महाजन, बार असोसिएशन अध्यक्ष, शिरपुर, ता. शिरपुर, जि. धुळे, अॅड. शिवाजी एन राजपुत व प्रविण जे. पाटील, मोटार अपघात दावा हाताळणारे तज्ञ वकील, शिरपुर, ता. शिरपुर, जि. धुळे यांनी मयत तसेच जखमी व्यक्तींच्या नातेवाईकांना मोटार अपघात दावा तसेच विमा संदर्भात येणा-या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करून कायदेविषयक मार्गदर्शन करुन शासकिय योजनाबाबत माहिती दिली.तसेच सदरचे अपघातामध्ये वेळोवेळी मृत्युंजय १. लोटन मोहन जगदेव, रा. मु. पो. पळासनेर, ता. शिरपुर, जि. धुळे, मो. क्र. ९९२१६४५२१२, २. अरविंद विजयसिंग जमादार, वय-३६, मु. पो. पळासनेर, ता. शिरपुर, जि. धुळे यांनी तात्काळ म.पो. केंद्र, शिरपुर येथील प्रभारी यांना फोनव्दारे सदर घटनेची माहिती देवून तात्काळ क्रेन तसेच अॅम्बुलन्सला फोन करून अॅम्बुलन्स बोलावुन म.पो. केंद्र, शिरपुर येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासोबत सदर अपघातग्रस्तांना वैद्यकिय उपचाराकामी अॅम्बुलन्समध्ये ठेवण्यास वाहतुक सुरळीत करण्यास वेळोवेळी मदत करीत असतात त्यामुळे अपघात ग्रस्तांना वेळीच उपचार मिळाल्याने अनेक अपघात ग्रस्तांचे प्राण वाचविलेले आहे. म्हणुन त्यांचाही कार्यक्रमात गौरव करून तसेच प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.