*नेर:* *नेर येथे खोपडी एकादशीनिमित्त तुलसी विवाह उत्साहात संपन्न* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे कोळी गल्लीत सालाबादाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने कार्तिकी एकादशी निमित्ताने खोपडी पूजन हे गावातील ठिकाणी केले जात असते.तसेच तुळशी विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. व तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत,या सणाची वैशिष्ट्ये,तुलसी दर्शनाचे महत्त्व,तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये,तसेच देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर करून हा विधी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात.तसेच श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे,हा तुळशी विवाहाचा विधी आहे.पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती.विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात.वृंदावनात ऊस,झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात.तसेच खोपडी पूजन हे बसून त्यांची पूजा करण्यात आली व चार उसांची झोपडी करून त्यात लहान मुलाला बसून त्याला बाजार भावाचे या वर्षी काय येणार व काय भाव फुटणार असे विविध प्रश्न विचारण्यात आले असुन यालाच खोपडी पूजन व तुलसी विवाह असे म्हंटले जाते.तसेच ज्या अंगणात तुळस आहे ती खूप महान आहे व ज्या घरात असते ही तुळस ते घर स्वर्ग सामान्य आहे.असे यावेळी पूजन करताना सांगण्यात आले.यावेळी तुळशी विवाह व खोपडी पूजन करण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक,बंधू,भगिनी,तरुण-तरुणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
. डॉ.भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन:
*नेर:* *डॉ.भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन:* *नेर:* साक्री येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे श्रीमती…
कृषि दुतांनी केले मातीची सुपिकता टिकविण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
*कृषि दुतांनी केले मातीची सुपिकता टिकविण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन*प्रतिनिधी गोपाल कोळीदोंडाईचा ता. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित विकास रत्न सरकार…
शहादा, डोंगरगाव, वडछिल मध्ये मे. स्वस्तिक कंपनीच्या ठेकेदाराने महसुल व वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरकारी पड राखिव वनविभागाच्या डोंगराचा लाखोटन गौण खनिज बेकायदेशीर काढला त्याबद्दल चौकशी करण्याची मागणी
शहादा, डोंगरगाव, वडछिल मध्ये मे. स्वस्तिक कंपनीच्या ठेकेदाराने महसुल व वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरकारी पड राखिव वनविभागाच्या डोंगराचा लाखोटन गौण…