शहरातील सर्व दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाटी लावण्यात यावे- मनसे
शहादा- शहरातील सर्व दुकानांवर तसेच आस्थापनांवर मराठी नामफलकाच्या पाटी लावणे बाबत मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा की, नुकत्याच सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार दुकाने तसेच आस्थापनांवर मराठीत नामफलके लावण्याची मुदत २८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत होती. कालपर्यंत मुदत संपली असून अद्यापही आपल्या कार्यक्षेत्रातील शहरातील काही दुकाने तसेच विविध आस्थापनांवर मराठीत नामफलकाच्या पाट्या लावण्यात आलेल्या नाही, असे आमच्या निदर्शनास आले आहे. वरील विषयास अनुसरून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपणास विनंती करितो कि, आपण तातडीने अश्या दुकानांचे तसेच आस्थपानांचे सर्व्हेक्षण करून सूचना तसेच दंडात्मक कारवाईच्या नोटीसा देण्यात याव्यात जेणे करून कुठेच कोर्टाने दिलेल्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. महाराष्ट्रात सर्व दुकानांवर व आस्थापनांवर मराठीत नामफलकाची पाटी लागलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कायमच राहिली आहे. तरी याला जोड म्हणून आता सुप्रीम कोर्टानेच आदेश दिला आहे तरी आपण तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी पाट्या लावण्या संदर्भात आंदोलन छेडण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला. निवेदनावर मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे, जिल्हा सचिव योगेश सोनार, तालुका सचिव अमेय राजहंस, शहर अध्यक्ष सुहास (दादू) पाटील, शहर सचिव रविकांत संजराय, वाहतूक सेना जिल्हा संघटक रुपेश राजपूत, महाराष्ट्र सैनिक शशी राजपूत, महाराष्ट्र सैनिक जगदीश राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.