अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी: बिरसा फायटर्सची मागणी

*अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी: बिरसा फायटर्सची मागणी**शहाद्याचे तहसीलदार यांना निवेदन* शहादा: अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,कृषी मंत्री,जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,वडगाव गाव अध्यक्ष राहूल चव्हाण, उपाध्यक्ष बिरबल पावरा,प्रभूदत्तनगर गाव अध्यक्ष विकास पावरा,उपाध्यक्ष रतिलाल पावरा,सोमनाथ पावरा,लक्ष्मण ठाकरे,विशाल पावरा,गोपाल भंडारी,पुखराज पावरा,सुरसिंग पावरा आदि बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,जिल्ह्यात अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली ज्वारी,तूर, कापूस,मिरची,पपई,केळी,कांदा पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेली ज्वारी भिजून खराब झाली.काढणीला आलेला कापूसही काळा-पिवळा पडण्याची भीती आहे.शहादा तालुक्यातील जावदा गावातील १४ वर्षीय मुलींचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी.जिल्ह्यात अनेक ठिकाणी चारा व घरांचेही अतोनात नुकसान झाले आहे.अगोदरच अनियमित पावसामुळे उत्पादन जेमतेम आहे.व शेतमालाला योग्य दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे.अस्मानी संकटाने हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले आहे.अनेकवेळा नुकसान पिकांचे पंचनामे होतात;मात्र,नुकसान भरपाई मिळत नाही.यासाठी सरकारने नुसती आश्वासने न देता;शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्यासाठी मदत करावी.तरी,अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!