*समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे जागतिक एच आई व्ही/ एड्स दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा संपन्न*समाजकार्य महाविद्यालय तळोदा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आज महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर तसेच पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर जागतिक एड्स दिवसाचे महत्त्व रासेयो कार्यक्रम अधिकारी रामचंद्र परदेशी यांनी उपस्थित कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सांगितले की एचआयव्ही होण्या पासून सावधगिरी कशी बाळगली पाहिजे ,एचआयव्ही झाल्यानंतर जीवन कसे जगले पाहिजे आणि एचआयव्ही साठी असलेले औषधोपचार याबाबत माहिती देण्यात आले. यानंतर प्राचार्या उषा भीमसिंग वसावे यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शन चे फित कापून उदघाटन करण्यात आले सदर पोस्टर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एचआयव्ही बद्दल विविध विषयांवर माहिती देण्यात आली यात एचआयव्ही सहजीवन कसे जगाव एचआयव्ही व्यक्ती सोबत जीवन कसे घालवनार, औषधोपचार, एच आए व्ही/ एड्स रोखण्यासाठी उपाय योजना त्याचबरोबर एच आय व्ही होण्याची कारणे ,लक्षणे आदी पोस्टर्स ने लक्ष वेधून घेतले सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य उषा भिमसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा रामचंद्र परदेशी, प्रा नीलेश गायकवाड़, प्रा प्रमोद जाधव, प्रा नितिन तायड़े, गुलाब संदानशिव आदी यांनी नियोजन केले
समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे जागतिक एच आई व्ही/ एड्स दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा संपन्न
