अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू.म्हसावद । प्रतिनिधी: खेडले तालुका तळोदा या ठिकाणी अज्ञात वाहनाने बिबटला जबर धडक दिल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला असल्याची घटना परिसरात घडली आहे.बिबटचा झालेल्या मृत्यमुळे पशुप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २ डिसेंम्बर २०२३ रोजी खेडले तालुका तळोदा या गावानजीक धानोरा कडे जाणाऱ्या रस्त्यावर मादी बिबट रस्ता ओलांडत असतांना तळोद्याकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने बिबटला जबर धडक दिल्याने बिबटच्या तोंडाला व मानेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली.या दुखापतीमुळे बिबटचा जागीचा मृत्यू झाल्याची घटना खेडले शिवारात घडली आहे. खेडले येथील नागरिक विजय पाटील, छोटूलाल पाटील, सतीश पाटील हे नियमित स्वरूपात मॉर्निंग वाकला खेडले येथून धानोरा रस्त्याकडे जात असतात. आपल्या ठरलेल्या वेळेला म्हणजेच सकाळी सहा वाजेला हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वाकला जात असतांना बिबट रस्त्यात मरून पडलेला त्यांना आढळून आला असता त्यांनी घरी आल्यानंतर या संदर्भात लागलीच तळोदा येथील वन अधिकारी यांना माहिती दिली. त्यांच्या या माहितीची दखल घेत तळोदा वन विभागाचे अधिकारी लक्ष्मण पाटील यांच्यासह वनपाल गिरधन पावरा, वनरक्षक वीरसिंग पावरा, राहुल कोकणी, जाण्या पाडवी,वाहनचालक सुरसिंग वळवी,दगडू पाडवी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी अजय मोलके सह घटनास्थळी पोहोचले व त्या ठिकाणी घटनेचा लागलीच त्यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी अजय मोलके यांनी सकाळी ठीक ८.०० वाजता शव विच्छेदन केले त्यात बिबट हा मादी असल्याचे निष्पन्न झाले असून वत्याचे वय साधारणतः तीन ते साडेतीन वर्ष असल्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आले.ही घटना ५ ते ६ तास आधी घडल्याचे ही त्यांनी सांगितले. पुढील प्रक्रिया पार पाडल्यानंतर बिबटला वनविभागाच्या वाहनात तळोदा येथे आणण्यात आले असून त्याच्यावर त्याचठीकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वन अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. यावेळी बिबटला पाहण्यासाठी परिसरातील धानोरा तसेच खेडले, मोड,तऱ्हावद, मोरवड कढेल येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Related Posts
सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा तर्फे श्री. कृषी तज्ञ दादा लाड यांच्या सत्कार.
*सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा तर्फे श्री. कृषी तज्ञ दादा लाड यांच्या सत्कार….* भारताचे देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते पद्म गौरव…
समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे जागतिक एच आई व्ही/ एड्स दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा संपन्न
*समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे जागतिक एच आई व्ही/ एड्स दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा संपन्न*समाजकार्य महाविद्यालय तळोदा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर…
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणिय श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानव्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती साजरा करण्या निमीत्त आढावा बैठक
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणिय श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानव्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा…