*आदिवासी विभागातील ग्रंथपाल भरती संदर्भात पात्रताधारक ग्रंथपालांनी मा.सत्यजित तांबे, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य यांना भारतीसंदर्भात दिले निवेदन* आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचेअंतर्गत भरती राबविली जात आहे यामध्ये उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्यलिपिक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षण सेवक( मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक, प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी) असे १९ संवर्गातील एकूण ६०२ पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर करण्यात आलेली आहे हि एक चांगली गोष्ट आहे, परंतु यामधील ६०२ पदांपैकी ग्रंथपालांच्या ३८ आणि सहाय्यक ग्रंथपाल १ अशा एकूण ३९ जागा नमूद केलेल्या आहेत परंतु नमूद जागांपैकी एकही जागा एस.टी. प्रवर्गासाठी आरक्षित नाही असे निदर्शनास येत आहे, मुळात आदिवासी विकास विभागाकडून सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि आदिवासींना यामध्ये एकही स्थान उपलब्ध नसेल तर हा आदिवासींविरोधात मोठा अन्याय आहे, आदिवासी समाजाला संपविण्याचे कारस्थान आहे. याची तात्काळ दखल घेऊन संवर्गनिहाय जागा आरक्षित करून भरती करावी, अन्यथा भरती बंद करावी, तसे न झाल्यास महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील ग्रंथपाल हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच पेसा अंतर्गत जी पदे काढून टाकली आहेत ती पूर्ववत करण्यात यावी तसेच ग्रंथपाल या पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय ती शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये व्यवस्थितपणे अभ्यास करून नमूद करण्यात यावी अशी मागणी सर्व पात्रताधारक ग्रंथपाल यांनी केली आहे, यासाठी मा.सत्यजित तांबे, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य यांची आदिवासी ग्रंथपाल पात्रताधारकांनी भेट घेऊन समाजावर होणाऱ्या या अन्यायाला रोखण्यासाठी आम्हा आदिवासींना मदत करावी असे निवेदन त्यांना दिले आहे. सर्व पात्रताधारक ग्रंथपालांच्या साक्षीने मा.सत्यजित तांबे, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य यांना दि.०२.१२.२०२३ रोजी निवेदन देऊन योग्य ती कार्यवाही करून आदिवासी समाजातील सर्व तरुणांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मा.लकीभाऊ जाधव तसेच सर्व पात्रताधारक ग्रंथपालांच्या वतीने ग्रंथपाल नूतन गवळी, संगीत पवार, रतिलाल कोकणी, दिलीप पाडवी, दीपिका खांबाईत, पंडित झुंबड, भीमा कणसे, कल्पना गावित हे ग्रंथपाल उपस्थित होते.
Related Posts
तिरढे तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांची कष्टकरी महिला, समाजातील दुर्लक्षित व गरजू शेतमजूर यांच्याबरोबर दीपावली साजरी.
तिरढे तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांची कष्टकरी महिला, समाजातील दुर्लक्षित व गरजू शेतमजूर यांच्याबरोबर दीपावली…
धरमपाल फौजदार चॅरिटेबल ट्रस्ट कडुन अपंग कुशल भानुशाली यास व्हीलचेअर भेट. .. !
धरमपाल फौजदार चॅरिटेबल ट्रस्ट कडुन अपंग कुशल भानुशाली यास व्हीलचेअर भेट. .. ! मुंबई (गुरुनाथ तिरपणकर)महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष,समाजसेवक…
समाजकार्य महाविद्यालय तळोद्यात स्वच्छता मोहीम संपन्न
*समाजकार्य महाविद्यालय तळोद्यात स्वच्छता मोहीम संपन्न* समाजकार्य महाविद्यालय तळोदा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे राष्ट्रीय सेवा…