भेलके महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

*भेलके महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन* पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रा. डॉ. तुषार शितोळे उपस्थित होते. डॉ. तुषार शितोळे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नव्हते. ते संवेदनात्मक लोकशाही कट्टर पुरस्कर्ते होते. स्वातंत्र, समता आणि बंधुत्व या तत्वानी अविरतपणे जीवन जगण्याचा मार्ग दाखविला तसेच राजकीय, सामाजिक, वैचारिक, आर्थिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मराठी विभाग प्रमुख डॉ जगदीश शेवते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाच्या कार्यामुळेच व्यक्तिमत्व बहुआयामी होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीयांसाठी एक आदर्श आहेत. भारताची राज्यघटना एका व्यक्तीची, जातीची, धर्माची नाही तर ती सर्वसमावेशक आहे असे सांगितले. डॉ. राजेंद्र सरोदे यांनी पुरोगामी विचारवंत समजून घ्यायचे असतील तर पुरोगामी विचाराचे असले पाहिजे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचे विचार व कार्याचा परामर्श घेऊन डॉ.बाबासाहेबांचा दूरदृष्टीकोण मांडला तसेच सर्व माणसांनी विवेकशील असावे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, डॉ हिमालया सकट, डॉ जगदीश शेवते, डॉ.राजेंद्र सरोदे, प्रा.सहदेव रोडे, प्रा.पौर्णिमा कारळे, प्रा.भगवान गावित, डॉ सचिन घाडगे, प्रा. जीवन गायकवाड , प्रा. जाधवर डी एस, प्रा. माऊली कोंडे, प्रा महेश कोळपे, प्रा पोमन कोमल, प्रा कापरे प्राजक्ता, प्रा.वर्षा तनपुरे, प्रा. ऐश्वर्या धुमाळ तसेच प्रशासकीय कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. सहदेव रोडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!