सर्पमित्र प्राणीमित्र मांगल्य फाऊंडेशन च्या संस्थापिका चैताली भस्मे यांनी निराधार,वृध्द महिलांना वाटली साडीचोळी

मांगल्य बहुद्देशीय संस्थे कडून अध्यक्षा चैताली भस्मे यांच्या अध्यक्षतेत गाव करंजी तालुका, केळापुर जिल्हा यवतमाळ येथे गरीब,निराधार, विधवा ,वृध्द, महिलांना साडीचोळी, पातळ,वाटण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला त्यामधे भुरकी पोड बेघर ,तांडा,येथील चंद्रकला सिडाम , फुला आत्राम ,अनुसया आत्राम,सरस्वती चव्हाण , माया बावणे, संगीता नगोसे,बहिणाबाई तिरपान,शामिबाई आत्राम इत्यादी ३५ निराधार आणि वृध्द लाभार्थी महिलांना साडीचोळी आणि पातळ वाटण्यात आले या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित मंडळी जिल्हापरिषद सदस्य निमिशभाऊ मानकर,सरपंच गणेश रामकुरे ,जागृत हनुमान देवस्थान चे अध्यक्ष अरुण बावणे,आणि प्रमुख कार्यकर्ते संजयजी आंबटकर ,प्रशांत आंबटकर,छबू ताई,बावणे,यांचे सहकार्य लाभले त्याप्रमाणेच मांगल्य संस्थेचे सदस्य पंकज आंबटकर मिलिंद राऊत ,श्रीकांत दोड,किशोर साळवी, विनर्स बांबोडे,आकाश गांधरे, छाया साखरकर, स्मिता शर्मा,देवयानी पाटील,मीनाक्षी वाट ,इत्यादी सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले मांगल्य संस्थेचे दर वर्षी समाजहितेशी उपक्रम अविरत चालू असतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!