नंदुरबार येथील टोकर तलाव डोंगरावरील मजुरांना पाण्याचे चालते फिरते ड्रामस् वाटप*

*नंदुरबार येथील टोकर तलाव डोंगरावरील मजुरांना पाण्याचे चालते फिरते ड्रामस् वाटप*नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव येथील डोंगर माथ्यावर वनविभाग यांच्या मदतीने 1000 रोपांची लागवड केली आहे. यामध्ये सौ. कल्पना थुबे, (उपजिल्हाधिकारी स.स प्र.) आणि यांच्या पुढाकाराने मजुरांचा फॉलोअप घेत दर शनिवार – रविवार टीमच्या मदतीने श्रमदानाच्या माध्यमातून 100% रोपे जगविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भर उन्हाळ्यामध्ये रोपे जगविण्यासाठी आजूबाजूला पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे मजुरांना आणि श्रम करिंना 5-5 लिटरच्या कॅनमध्ये 2 किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन यावे लागते. विद्यमान उपजिल्हाधिकारी श्री. शाहूराज मोरे यांच्याशी चर्चा करताना सदर समस्या श्री.गुणवंत पाटील यांना कळाली. तेव्हा व्हाईट लोटस मल्टीपर्पज फाउंडेशन, जळगांव आणि वेल्स ऑन व्हील्स, लंडन या संस्थेतर्फे 50 लिटर क्षमतेचे पाण्याचे चालते फिरते 4 ड्रम्स मजुरांना देण्यात आले. यामुळे मजुरांचे आणि श्रमकऱ्यांचे काम सोपे होईल . आता 2 किलोमीटर वरून पाणी आणताना एक व्यक्ती आरामात 50 लिटर पाणी एका खेपेत कमी वेळात आणू शकतो. या मुळे रोपांना पाणी देणे सोपे होईल आणि निसर्गाचे संवर्धन होईल. तरी ड्रम्स वाटप कार्यक्रम प्रसंगी WLMF संस्थेचे अध्यक्ष गुणवंत पाटील, स्वाती येशिराव, पुष्पा पाटील, WOW संस्थेचे अजय देवरे, नारायण सर, जिल्हा MIS अधिकारी संदीप निकम, पाणी फाऊंडेशन चे भुषण ठाकरे, प्रणय गोरीवले, व नंदुरबार तालुका स्तरावरील म.गा.रोहयो टीम इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!